Ramraje Naik Nimbalkar News : ''..तर 'तुतारी' वाजवायला कितीसा वेळ लागेल'' ; रामराजे नाईक- निंबाळकरांचं सूचक विधान!

Ramraje Naik Nimbalkar on Ranjeetsingh Naik Nimbalkar : रणजितसिंह निंबाळकर व त्यांचे साथीदार गल्लोगल्ली दहशत करत आहेत, असा आरोपही रामराजेंनी केला आहे.
Ramraje Naik Nimbalkar
Ramraje Naik NimbalkarSarkarnama
Published on
Updated on

Phaltan Politics News : 'माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर व त्यांचे साथीदार गल्लोगल्ली दहशत करत आहेत. त्या दहशतीला, भाजपने सत्तेतून साथ देऊ नये, हीच खरी कार्यकर्त्यांची तक्रार आहे. ही बाब मी अजित पवार यांच्‍याही कानावर घालणार आहे, त्‍यानंतरही हे असेच सुरू राहिले, तर तुतारी वाजवायला कितीसा वेळ लागेल.', अशा सूचक इशारा देत आमदार रामराजे नाईक- निंबाळकर यांनी आज कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष, उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांची जनसन्‍मान यात्रा उद्या (सोमवार) फलटणमध्ये येत आहे. त्‍यावेळी अजित पवार हे फलटण शहर व तालुक्यातील सर्व घटकांशी, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी घेतलेल्या भूमिकेवर अजित पवार नेमके काय बोलणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहणार आहे.

आमदार रामराजे(Ramraje Naik Nimbalkar) यांच्या निवासस्थानी प्रमुख कार्यकर्त्यांची रविवारी बैठक झाली. या बैठकीत रामराजे यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह राष्ट्रवादीचे तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Ramraje Naik Nimbalkar
Video Ramraje Naik Nimbalkar : पश्चिम महाराष्ट्रातील नेत्याचा हाती तुतारी घेण्याचा इशारा, अजितदादांना मोठा धक्का?

'उद्याचा कार्यक्रम हा पक्षाचा कार्यक्रम आहे. आपण आजच्या घटकेला त्या पक्षात आहोत. लोकसभा निवडणुकीपूर्वी मी व्यक्तिगत, माझ्या आई-वडिलांविषयी बोललेलं मला सहन होणार नाही, मी एक वेळ राजकारण सोडेन; पण ज्यांनी अशा प्रकारचे उद्‌गार काढले, त्यांच्या स्टेजवर बसणार नाही, हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना सांगितले होते. त्‍यावेळी माजी खासदार तसेच भारतीय जनता पक्षाचे स्वतःला जिल्ह्याचे सर्वेसर्वा मानणारे माणचे आमदारही होते.', असेही आमदार रामराजे यांनी पुन्‍हा स्‍पष्‍ट केले.

माजी खासदार जर हॉटेलमध्ये बसून आपला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार पहिल्या यादीत येणार असल्‍याचे सांगत असतील, तर मग आपण युतीत राहायचं की नाही, हे ते ठरवणारे कोण? ते देवेंद्र फडणवीस यांच्याही वर गेले आहेत का? असा सवालही रामराजेंनी उपस्‍थित केला.

रामराजे पुढे म्‍हणाले, ‘‘उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) हे फलटणला येत आहेत. त्यांचे कार्यक्रम झाले, की त्यांच्याकडे आपण वेळेची मागणी करणार आहोत. त्यांनी वेळ दिली, तर आपणास सध्याच्या घडमोडींबाबत सविस्तर चर्चा करता येईल व कार्यकर्त्यांनाही आपली मते मांडता येतील. जर ते म्हणाले या तुम्‍हाला वेळ देतो, तर ठीक. आपण कार्यक्रम करू. अन्‍यथा शेवटी काय करायचे आहे आणि काय नाही हे आता आमच्‍या हातात राहिलेलं नाही.’’

Ramraje Naik Nimbalkar
Uday Samant on Uddhav Thackeray : 'न्यायमूर्तींनाच न्याय देण्याबाबत सल्ले देणारे महाभाग..' ; उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!

दादा आम्ही वागायचं कसं..? -

आपल्यातले काहीजण फुटल्यानंतर आपण थेट अजित पवार यांना फोन केला होता. दादा, आम्ही काय करायचं आहे, हे आम्हाला निश्चित सांगा. ज्यांना जायचं आहे ते गेले, तर आमची हरकत नाही; पण त्यांना पदं द्यायची कारण काय आहे? तालुक्‍यात शासकीय योजनांची सर्वाधिक नोंदणी आम्हीच केली आहे. भाजपचे(BJP) कामगार मंत्री येतात, आम्हाला बोलावलंही जातं नाही. उलट जर ते कमिन्स कंपनीची चौकशी लावून जाणार असतील, तर आम्ही वागायचं कसं? कार्यकर्त्यांची जी भावना आहे, ती मी अजित पवार यांच्‍या कानावर घालणार असल्याचेही आमदार रामराजे यांनी यावेळी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com