Phaltan News : रामराजेंचे खासदार निंबाळकरांना आव्हान... उभा राहाच, तुम्हाला पाडणारच

Ramraje Naik Nimbalkar फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघ बूथ कमिटी सदस्यांच्या फलटण येथे आयोजित मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून रामराजे बोलत होते.
Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkarsarkarnama
Published on: 
Updated on: 

-किरण बोळे

Phaltan News : आगामी माढा लोकसभा निवडणुकीत उमेदवार कोण, ही बाब गौण आहे. आपण की संजीवराजे, ही बाब महत्त्वाची नाही; पण विद्यमान खासदार यांचा पराभव करणार, हे निश्चित झाल्याचे सांगत सन २०१९ च्या निवडणुकीत ते सोलापूर जिल्ह्यामुळे विशेषतः माळशिरस तालुक्यातील पाठिंब्यामुळे निवडून आले असले तरी आता उभा राहाच, तुम्हाला पाडणारच, असा निर्धार केल्याचे विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

फलटण-कोरेगाव Phaltan-Koregaon विधानसभा मतदारसंघ बूथ कमिटी सदस्यांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगर परिषद, सहकारी संस्था पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते यांच्या फलटण येथे आयोजित मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून रामराजे Ramraje Naik Nimbalkar बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादीचे बूथ कमिटी प्रदेश अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, सहअध्यक्ष आमदार अरुण लाड, आमदार दीपक चव्हाण, आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, बाळासाहेब सोळसकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, संजीवराजे नाईक-निंबाळकर, माणिकराव सोनवलकर, दत्ता अनपट, महानंदचे संचालक डी. के. पवार आदीं उपस्थित होते.

रामराजे म्हणाले, २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक निकाल म्हणजे अपघात होता, आता असा अपघात पुन्हा घडणार नाही, यासाठी आपण आणि येथील मतदार सावध असल्याने आता पुन्हा अपघात होऊ न देण्याची ग्वाही देत, आता मला तुम्ही फक्त दिल्लीत सोडा, बघा मी काय-काय करून येतो. दिल्लीत जाण्याची आपली पहिल्यापासून इच्छा आहे.

Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Phaltan News : माढ्यात भाजपच्या निंबाळकरांविरोधात राष्ट्रवादीकडून 'राम'अस्त्र

राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये गेलेली मंडळीच भाजपला संपविणार असून, तालुक्यातील स्थानिक पातळीवर आमचेच दोन वेगवेगळे गट तयार झाले आहेत. त्या दोन्ही गटांना एकत्रित आणण्यासाठी आपणाला प्रयत्न करावा लागणार असल्याचे सांगताना आज पाणी प्रश्‍नावर सगळे बोलू लागले आहेत. श्रेय घेण्याचा सर्वांचाच प्रयत्न आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील पाणी प्रश्‍नावर सगळे कष्ट आमचेच आहेत, हे या बोलणारांनी लक्षात घ्यावे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Satara Dcc Bank Result
Ranjitsinh Naik Nimbalkar Ramraje Naik Nimbalkar
Jaykumar Gore and Ramraje Naik Nimbalkar
Ramraje Naik Nimbalkar