डिसले गुरूजी गाजवणार जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा

ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) हे आता चांगलेच अडकले आहेत.
Ranjitsinh Disale
Ranjitsinh Disale Sarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) हे आता चांगलेच अडचणीत आहेत. अधिकाऱ्यांनी मानसिक त्रास दिल्याचा आणि पैसे मागितल्याचा खळबळजनक आरोप डिसलेंनी केला होता. या प्रकरणी पुरावे सादर करता न आल्याने त्यांनी जिल्हा परिषदेसमोर (ZP) माफीनामा सादर केला होता. तरीही यातून त्यांची सुटका झाली नसून, त्यांना पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आज होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हाच मुद्दा केंद्रस्थानी असणार आहे. (Ranjitsinh Disale News)

डिसले गुरुजींच्या आरोपांमुळे सोलापूर जिल्हा परिषदेची राज्यभरात बदनामी झाली आहे. यामुळे आज दुपारी २ वाजता होणाऱ्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा गाजण्याची शक्‍यता आहे. कोरोनामुळे जिल्हा परिषदेची उद्याची सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. डिसले गुरुजी प्रकरणात जिल्हा परिषदेने कठोर भूमिका घेतली आहे. डिसले गुरुजींच्या संदर्भात 2021 मध्ये झालेल्या चौकशीचा अहवाल प्राथमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे पाठविला आहे. हा विषय संवेदनशील असल्याने याची पडताळणी करण्याच्या सूचना स्वामी यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिल्याचे समजते. डिसले गुरुजी यांचा माफीनामा, पाच जणांच्या चौकशी समितीचा अहवाल या बाबी जिल्हा परिषद बारकाईने व काटेकोरपणे हाताळत आहे.

Ranjitsinh Disale
मी क्षमा मागतो! अडचणीत येताच बंडातात्या माफी मागून झाले मोकळे!

या सर्व प्रकरणात डिसले गुरुजींनी अडचणीत येताच माफीनामा सादर करून या वादावर पडदा टाकण्याचा निर्णय घेतला होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना डिसले यांनी दोन पानी पत्र पाठवले होते. या पत्रात त्यांनी झालेल्या प्रकाराबाबत माफी मागितली होती. यापुढे थेट प्रसारमाध्यमांसमोर जाणार नाही, अशी कबुलीही डिसले यांनी दिली होती. त्यांनी आता माफीनामा सादर करीत हे प्रकरण थांबवण्याची मागणी केली आहे. डिसले यांच्या माफीनाम्याची जोरदार चर्चा सध्या जिल्हा परिषदेत रंगली होती.

Ranjitsinh Disale
मोठी बातमी : चीनमधील ऑलिंपिक स्पर्धेवर भारताचा बहिष्कार

डिसले यांना अमेरिकेत फुलब्राईट शिष्यवृत्तीसाठी रजा मंजूर न करण्यात आल्यावरून मोठा गदारोळ उडाला होता. यात थेट शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हस्तक्षेप केला होता. त्यावेळी डिसले यांनी अनेक गंभीर आरोप केले होते. पैशांची मागणी झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. माध्यमांसमोर आरोप करण्यापूर्वी डिसले गुरुजींनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अथवा न्यायालयात का गेले नाहीत, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित झाला होता. आता या प्रकरणी त्यांना पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्यांनी पुरावे सादर न केल्यासही त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम व जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी वर्तणूक अधिनियमानुसार डिसले यांच्यावर या प्रकरणी कारवाई होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com