Solapur Politic's : बावनकुळेंची भेट घेतली तरी रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपतून हकालपट्टी होणारच; जिल्हाध्यक्षांनी इरादे केले स्पष्ट

Ranjitsinh Mohite Patil : रणजितसिंह मोहिते पाटलांनी बावनकुळेंची भेट घेऊन आपण आजही पक्षासोबत एकनिष्ठ आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, निवडणुकीत जे जे चुकीचं वागलेत, त्या सर्वांना त्यांची जागा दाखवली जाईल
Ranjitsinh Mohite Patil-Chetansinh Kedar Sawant
Ranjitsinh Mohite Patil-ChetanSinh Kedar SawantSarkarnama
Published on
Updated on

Sangola, 02 December : माळशिरस विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम सातपुते यांच्या विरोधात काम करणारे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षातून बडतर्फ करण्यात यावे, अशी शिफारस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. मोहिते पाटलांनी बावनकुळेंची भेट घेऊन आपण आजही पक्षासोबत एकनिष्ठ आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, निवडणुकीत जे जे चुकीचं वागलेत, त्या सर्वांना त्यांची जागा दाखवली जाईल. मोहिते पाटलांना भाजपतून लवकरच बडतर्फ करण्यात येईल, असे भाजपचे सोलापूर ग्रामीण पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी सांगितले.

माळशिरस मतदारसंघातून (Malshiras Constituency) भाजपकडून राम सातपुते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उत्तम जानकर यांनी निवडणूक लढवली होती. त्यात निवडणुकीत सातपुते यांचा जानकर यांच्याकडून पराभव झाला. पराभवानंतर सातपुते यांनी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांना धमकावण्याचा आणि पक्षविरोधी काम केल्याचा आरोप केला होता. पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या मोहिते पाटलांची भाजपतून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली होती.

सातपुते यांच्या मागणीनुसार जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांच्या हकालपट्टीची शिफारस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती. त्यानंतर पंढरपुरात आलेले आमदार श्रीकांत भारतीय यांनीही मोहिते पाटील यांना लवकरच पक्षातून बडतर्फ करण्यात येईल, असे सांगितले होते.

दरम्यान, भाजपचे स्थानिक नेते हकालपट्टीची मागणी करत असतानाच रणजितसिंह मोहिते पाटील यांनी थेट प्रेदशाध्यक्ष बावनकुळे यांची भेट घेतली होती. त्यामुळे सोलापुरात खळबळ उडाली होती. त्यावर स्पष्टीकरण देताना जिल्हाध्यक्ष केदार-सावंत यांनी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या मोहिते पाटलांवर कारवाई होईल, असे स्पष्ट केले आहे.

Ranjitsinh Mohite Patil-Chetansinh Kedar Sawant
Ramesh Kadam : पवारांच्या राष्ट्रवादीतील माजी आमदाराला आपला बाबा सिद्धिकी होण्याची भीती; पोलिस अधीक्षकांची घेतली भेट

भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्याने चंद्रशेखर बावनकुळे हे कोणाचीही भेट टाळू शकत नाहीत. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची भेट घेतल्याचे फोटो व्हायरल करून प्रसिध्दी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

एकीकडे भाजपच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी पुढाकार घ्यायचा आणि दुसरीकडे पक्षातून निलंबनाची कारवाई होऊ नये, यासाठी सहानुभूती मिळविण्यासाठी भाजप नेत्यांची भेट घेतल्याचे फोटो व्हायरल करायचे, अशी दुटप्पी भूमिका आमदार मोहिते-पाटील यांनी घेतली आहे, असेही केदार सावंत यांनी म्हटले आहे.

Ranjitsinh Mohite Patil-Chetansinh Kedar Sawant
Manoj Jarange Patil : निवडणुकीत उतरलो असतो तर सगळ्यांचा सुपडासाफ केला असता; मनोज जरांगेंचा हल्लाबोल

मोहिते पाटलांबाबत देवेंद्र फडणवीस, बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील योग्य ती भूमिका घेतील आणि पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या मोहिते पाटलांवर निलंबनाची कारवाई करतील. जे जे विधानसभा निवडणुकीत चुकीचं वागले आहेत, त्या सर्वांना त्यांची जागा दाखवली जाईल, असा इशाराही केदार-सावंत यांनी दिला आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com