Sangli DCC Bank : मानसिंगराव नाईक ॲक्शन मोडवर; 19 अधिकाऱ्यांचे पथक लावले कामाला...

Mansingrao Nike on Action Mode : थकबाकीदारांवर कडक कारवाईची वेळ आणू न देता कर्ज भरावे, असा इशारा मानसिंगराव नाईक यांनी दिल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.
Mansingrao Nike
Mansingrao Nike Sarkarnama
Published on
Updated on

Sangli News : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एनपीए मार्चअखेर कमी करण्यासाठी बँकेचे अध्यक्ष तथा आमदार मानसिंगराव नाईक ॲक्शन मोडवर आले आहेत. थकबाकीदारांच्या वसुलीसाठी त्यांनी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी जिल्ह्यात 19 अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करीत त्यांना कामाला लावले आहे. मार्चअखेरपर्यंत सुट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. थकबाकीदारांवर कडक कारवाईची वेळ आणू न देता कर्ज भरावे, असा इशारा नाईक यांनी दिल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. (Team of 19 officers for recovery of dues of Sangli District Co-operative Bank)

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एनपीए पाच टक्के आणि त्यानंतर शून्य टक्क्यांवर आणण्यासाठी बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मार्चअखेरीला दोन ते पावणेदोन महिने शिल्लक राहिले असल्याने थकीत एनपीएची रक्कम कमी करण्यासाठी वसुलीसाठी जिल्ह्यात जोरदार मोहीम सुरू केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mansingrao Nike
Thorat on Firing Incident : 'दोन उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री व्हायचंय, सत्तेच्या महत्त्वाकांक्षेमुळे तिघेही अपयशी'

थकबाकी वसुलीसाठी बॅंकेचे अध्यक्ष नाईक यांनी रविवारी सुटीच्या दिवशीही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कामाला लावले आहे. मार्चअखेरपर्यंत शनिवारी आणि रविवारच्या सुट्याही बंद केल्या आहेत. एनपीए थकबाकीमध्ये निम्याहून अधिक रक्कम जत तालुक्यातील आहे. त्यातील सुमारे 15 कोटी रुपये रक्कम कोणत्याही परिस्थितीत वसूल करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी वाघ यांना तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या बैठकावर बैठका घेऊन वसुलीबाबत कडक सूचना दिल्या आहेत.

मार्चची नियमित वसुली होईलच, याची अडचण नाही. मात्र, एनपीएची थकबाकी वसुलीचे आव्हान आहे. एनपीएतील सुमारे 53 कोटींपैकी 18 कोटींची वसुली केली आहे. उर्वरित वसुलीसाठी नियोजन केले आहे. या थकबाकीमध्ये जत तालुक्याची रक्कम अधिक आहे. यामुळे या तालुक्यावर अधिक लक्ष केंद्रित केले असून, यासाठी 19 अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. मार्चअखेर ही वसुली होणे महत्त्वाचे आहे, जतची वसुली झाली तर एनपीए कमी होण्यास मदत होणार आहे.

Mansingrao Nike
Satara Politics : पृथ्वीराजबाबांमुळेच गोरे आज नेते म्हणून मिरवित आहेत; काँग्रेसचा चव्हाणांसह भोसलेंवर पलटवार

जिल्हा बँकेच्या सर्वच थकबाकीदारांनी वसुलीसाठी सहकार्य करावे. जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह इतर उद्योग व्यवसायासाठी कर्जपुरवठा करण्यासाठी जुनी थकबाकी वसूल होणे महत्त्वाचे आहे. कडक कारवाईची वेळ आणू न देता थकबाकी भरावी, असेही आवाहन बँकेचे अध्यक्ष आमदार नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी वाघ यांनी केले आहे.

Edited By : Vijay Dudhale

R

Mansingrao Nike
Maratha Reservation : ॲड. सदावर्तेंना बारसकरांनी माहिती पुरवली; मराठा समाजाच्या बैठकीत दाखवला भेटीचा फोटो...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com