

Kolhapur News : भारतीय रिझर्व बँकेकडून सहकारी बँकेत सलग दहा वर्ष संचालक असणाऱ्यांना सलग संचालक होता येणार नाही. असा नवीन नियम लागू केला होता. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक दिग्गज मंत्री आमदार यांना कोल्हापूर जिल्हा बँकेवर सलग दहा वर्ष संचालक झाल्यानंतर पुन्हा पाच वर्ष संचालक होता येणार नव्हते. मात्र रिझर्व्ह बँकेने या नियमात काही बदल करून अशा संचालकांना दिलासा दिला आहे. राज्यासह देशभरातील सहकारी बँकेमधील संचालकांना सलग दहा वर्ष संचालक राहिल्यानंतर सलग तिसऱ्या टर्मला संचालक राहता येणार नाही. पण त्यानंतर तीन वर्षांनी पुन्हा संचालक होता येणार आहे.
सहकारी बँकातील अपहाराचे प्रमाण पाहता भारतीय रिझर्व बँकेकडून सहकारी बँकेचे नियमात कडक बदल केले होते. सहकारी बँकेमध्ये कुलिंग कालावधी हा नवीन नियम अमलात आणून एखाद्या संचाकाला केवळ दहा वर्षे इतका कालावधी मर्यादित करण्यात आला होता.
राज्यासह देशभरातील अनेक सहकारी बँकांमध्ये तब्बल वीस ते पंचवीस वर्ष संचालक पदावर राहून अनेक गैरव्यवहार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील देखील जिल्हा बँक यासारख्या सहकारी बँकेत देखील 20 ते 30 वर्ष संचालकांनी तळ ठोकला आहे.
त्यामुळे सहकारी बँकेत वाढणाऱ्या गैरव्यवहारांना रोखण्यासाठी भारतीय रिझर्व बॅंकेकडून दहा वर्ष संचालक पदाची मर्यादा करण्यात आली होती. त्याला राज्यातील काही सहकारी बँकेतील संचालकांनी आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील संचालकांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. पण रिजर्व्ह बँकेच्या बाजूने हा निकाल दिला होता.
मात्र आता रिझर्व बँकेकडून या नियमात काही शितलता केली आहे. दहा वर्ष संचालक राहिल्यानंतर पुढील वर्षी त्या संचालकांना बँकेचे संचालक होता येणार नाही. मात्र त्यानंतरच्या तीन वर्षाच्या कुलिंग कालावधीनंतर बँकेचे संचालक होता येणार आहे. कुलिंग कालावधीत बँकेचे कोणतेही पद धारण करता येणार नाही. केवळ सभासद म्हणून व्यवहार करण्याची मुभा भारतीय रिझर्व बँकेने दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.