Satara NCP : जिल्ह्यात बदल्यांसाठी पैसे घेण्याचे प्रकार; पुराव्यासह उघड करणार : शशिकांत शिंदेंचा गौप्यस्फोट

NCP Meeting राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात बुथ बांधणीबाबतच्या बैठकीनंतर आमदार शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
Shashikant Shinde, Eknath Shinde
Shashikant Shinde, Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Shashikant Shinde News : आपल्या सोयीचे अधिकारी व कर्मचारी यांची बदली करण्याचे षडयंत्र सध्या जिल्ह्यात सुरु आहे. बदल्यांसाठी पैसे घेतले जात आहेत. त्यामध्ये महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय या बदल्यासाठी पैसे घेतले जात असून येत्या काही दिवसांत पुराव्यासह जाहीर केले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु असलेल्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोदून काढू, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस NCP कार्यालयात बुथ बांधणीबाबतच्या बैठकीनंतर आमदार शिंदे Shashikant Shinde यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार शिंदे म्हणाले, येऊ घातलेल्या निवडणुकांत आपली खरी लढाई आहे. खासदारकी, आमदारकी, झेडपी, पंचायत समिती जिंकून आणायची आहे. त्याकरता पक्षाचे विविध सेल, बुथ कमिटय़ा ॲक्टीव्ह करायचे आहेत. बालेकिल्ला कायम राहण्यासाठी कामाला सुरुवात करा.

सत्ताधारी हे सत्तेच्या माध्यमातून प्रचंड भ्रष्टाचार करत आहेत. जिल्हा परिषद कर्मचारी, मंडलाधिकाऱ्यांकडून पैसे मागितले जात आहेत. कर्मचारी बदल्यावेळी त्यांचा कार्यकाळ पुर्ण झाल्यावर चॉईसवर बदली होते. मला मिळालेली माहिती अशी की बदलीसाठी डायरेक्ट पाच लाखांची मागणी केली जात आहे. हे यशवंतराव चव्हाणांच्या जिल्ह्यात दुर्दैवी आहे.

Shashikant Shinde, Eknath Shinde
NCP's Strategy News : महाविकास आघाडीत भंडारा-गोंदिया मिळावा, यासाठी राष्ट्रवादीची ‘ही’ स्ट्रॅटीजी !

महसूल, पोलीस खाते आणि झेडपी अशा सर्वच ठिकाणी आपल्या सोयीची माणसे बसवली जात आहेत. हे आगामी निवडणुकांत अडचणीचे ठरु शकते. याबाबत लवकरच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सीईओं यांना पुराव्यासकट जाब विचारुन जाणीव करुन देणार आहोत. एका बाजूला बुथ कमिटय़ा चांगल्या करत असू तर दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती होत असेल तर ही बाब धोक्याची आहे.

Shashikant Shinde, Eknath Shinde
Brij Bhushan Sharan Sinh; भाजपने उचललं मोठं पाऊल | Wrestlers protest | Delhi | BJP | Sarkarnama

मी कोल्हापूरला परवा गेलो होतो. तेथे सगळया कारखान्यांच्या निवडणूका लागल्या. त्यामध्ये फक्त केबी पाटील कारखान्याची निवडणूक पुढे ढकलली. सत्तेचा किती दुरुपयोग करायचा हे दिसते, असे स्पष्ट त्यांनी केले. लोकसभेच्या निवडणूका जाहीर होतील, तेव्हा सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा सक्षम उमेदवार दिला जाईल. त्यांनी कितीही सांगू 46,42, 43 खासदार निवडून येणार. पण यावेळी त्यांच्या दहा जागा सुद्धा निवडून येणार नाहीत. आगामी काळात जिल्हयात पक्ष पूर्णपणे सक्रिय होईल.

Shashikant Shinde, Eknath Shinde
Congress on Loksabha Seat : महाविकास आघाडी एकत्रच लढणार का? जागांवाटपावरून काँग्रेसनं स्पष्टच सांगितलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com