Tanaji Sawant : ठिणगी पडली! तानाजी सावंत पक्षात गद्दारी करत आहेत, 'CM'नी हकालपट्टी करावी; शिंदे गटातील नेता आक्रमक

Manish Kalje Vs Tanaji Sawant : "तानाजी सावंत यांनी पक्षाला स्वत:च्या घराचा पक्ष समजणे बंद करावे. पक्षाला अल्टिमेटम तर देऊच नये," असा इशारा शिंदे गटातील नेत्यानं दिला आहे.
eknath shinde | tanaji sawant.jpg
eknath shinde | tanaji sawant.jpgsarkarnama
Published on
Updated on

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेनेचे ( शिंदे गट ) सोलापूर जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. तानाजी सावंत यांनी पक्षाला स्वत:च्या घरचा पक्ष समजणे बंद करावे, अशा शब्दांत जिल्हाप्रमुख काळजे यांनी फटकारलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी तानाजी सावंत ( Tanaji Sawant ) यांची हकालपट्टीची मागणी केल्यामुळे पक्षात सारं-काही अलबेलं नसल्याचं दिसून येत आहे. मात्र, मनिष काळजे यांच्या मागणीची मुख्यमंत्री शिंदे दखल घेतात का? हे पाहावं लागणार आहे.

eknath shinde | tanaji sawant.jpg
Dharashiv Assembly Election : धाराशिवमधील सेनेच्या बालेकिल्ल्यात विधानसभेला कोण बाजी मारणार ?

मनिष काळजे म्हणाले, "एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी जनतेसाठी उठाव केला आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राबविलेल्या योजनांमुळे जनता खूश आहे. असं असताना पक्षात राहून तानाजी सावंत धोका देत आहेत."

"तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि पक्षाच्या विरोधात अनेकवेळा वक्तव्य केली आहेत. त्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी तानाजी सावंत यांना समजही दिली आहे. तानाजी सावंत सुधारतील म्हणून आम्ही शिवसैनिक गप्प होतो. पण, वारंवार युतीत खोडा घालण्याचं काम ते करत आहेत," अशी टीका जिल्हाप्रमुख काळजे यांनी केली.

"तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सांवत हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटायला जातात. तानाजी सावंत यांच्या सांगण्यावरून भेटायला गेल्याचं अनिल सावंत यांनी सांगितलं. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आमच्यात राहून तानाजी सावंत असे करत असतील तर हे अतिशय चुकीचं आहे," असं जिल्हाप्रमुख काळजे यांनी फटकारलं आहे.

"मुख्यमंत्री शिंदे यांनी तानाजी सावंत यांचा राजीनामा घेत पक्षातून त्यांची हकालपट्टी करावी. तानाजी सावंत यांच्या बंधूनं भाजपऐवजी 'तुतारी'चा प्रचार करण्यास सांगितलं होतं. यावरून लक्षात येते की हे आपल्यात राहून आपल्याशी गद्दारी करत आहेत," असा हल्लाबोल जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी तानाजी सावंत यांच्यावर केला आहे.

eknath shinde | tanaji sawant.jpg
CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची अवस्था 'धरलं तर चावतंय सोडलं तर पळतयं' 'हे' नेते कारणीभूत

"काही दिवसांपूर्वी 'मी मुख्यमंत्र्यांचं सुद्धा ऐकत नाही,' असं विधान तानाजी सावंत यांनी केलं होतं. अशा व्यक्तीनं पक्षाला स्वत:च्या घराचा पक्ष समजणे बंद करावे. पक्षाला अल्टिमेटम तर देऊच नये. मुख्यमंत्री शिंदे यांना अल्टिमेट देणाऱ्यांचे काय हाल झालेत, हे पाहिलं आहे. भविष्यात तुमचेही ते हाल होतील," असा इशारा जिल्हाप्रमुख काळजे यांनी तानाजी सावंत यांना दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com