

Satara, 06 August : संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी 2011 ठराव दाखल झाले आहेत. मात्र, एकूण मतदारसंख्येच्या तुलनेत 406 ठराव कमी झाले आहेत. या ठरावांमध्ये भारतीय जनता पक्षाने वर्चस्व राखल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे जाहीर केल्याप्रमाणे जिल्हा बॅंक हाती घेण्याच्या दिशेने भाजपची वाटचाल असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, शेवटच्या दिवशी जावळी तालुक्यातील हातगेघर सोसायटीचा ठराव रद्द झाला आहे, तर माण तालुक्यातील पळशी सोसायटीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे, त्यामुळे जिल्हा बॅंकेतही फलटण आणि पाटण वगळता बहुतांश ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच लढत होण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यात सर्वाधिक ४४८ ठराव हे शिवेंद्रसिंहराजे भोसले, शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले यांच्यात सातारा तालुक्यात झाले आहेत, त्यानंतर कऱ्हाडमध्ये २७६, तर शंभूराज देसाई इच्छूक असलेल्या पाटणमध्ये १६० ठराव झाले आहेत. दूध संस्था मतदारसंघात १६१ ठराव झाले आहेत.
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी सोसायटी मतदारसंघातून सर्वाधिक 958 ठराव झाले आहेत. खरेदी-विक्री संघ, कृषी प्रक्रिया मतदारसंघातही शंभर टक्के ठराव झाले आहेत. आता या ठरावांची माहिती जिल्हा बॅंकेकडे पाठवली जाणार आहे. त्यांची यादी तयार करून ती विभागीय सहनिबंधकांकडे पाठविली जाणार आहे, त्यानंतर कच्ची मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी सहा मतदारसंघांतून मतदार प्रतिनिधी निवडण्याची ठराव प्रक्रियेचा पाच ऑगस्ट हा अखेरचा दिवस होता. इच्छुकांनी आपापल्या मर्जीतल्या प्रतिनिधींचे ठराव करण्यावर भर दिला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी भाजप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत वादाचे प्रसंग झाले.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी जिल्हा बॅंक ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, त्यासाठी जास्तीत जास्त आपल्या मर्जीतले ठराव करण्यावर या नेत्यांनी भर दिला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत.
ठराव घेण्याच्या अखेरच्या दिवशी खरेदी-विक्री संघ मतदारसंघातून ११, कृषी प्रक्रिया सहकारी संस्था मतदारसंघातून ३० असे शंभर टक्के ठराव झाल्याचे सांगण्यात आले. सातारा तालुक्यात सोसायटी, खरेदी-विक्री संघ आणि कृषी प्रक्रिया मतदारसंघातून शंभर टक्के ठराव झाले आहेत. नागरी बॅंक व पतसंस्था मतदारसंघात ६० टक्केच्या आसपास ठराव झाले आहेत.
झालेल्या ठरावांची माहिती आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडे पाठविली जाणार आहे. झालेल्या ठरावाची जिल्हा बॅंकेकडून मतदारयादी तयार करून ती विभागीय सहनिबंधकांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर कच्ची प्रारूप यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर अंतिम यादी करण्यासाठीचा कार्यक्रम जाहीर होईल.
सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीसाठी झालेले तालुकानिहाय ठराव पुढीलप्रमाणे
तालुका.....................ठराव
सातारा..................... ४४८
कऱ्हाड..................... २७६
फलटण......................२४५
पाटण........................ १६०
खटाव.........................१४८
वाई........................... १३६
कोरेगाव.......................१२१
माण........................... ११८
खंडाळा......................... ८५
जावळी.......................... ६६
महाबळेश्वर.......................४७
दूध संस्था...................... १६१
एकूण......................... २०११
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.