

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उत्तम जानकर यांनी भाकीत केले की बिहारमध्ये फक्त ३०% मतांनी भाजप सत्तेवर येईल, तर ७०% मते मिळवूनही विरोधक पराभूत होतील.
त्यांनी ईव्हीएम आणि मतदारयादीतील घोळ यांचा आधार घेत निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
जानकर यांनी सुचवले की, मतदान मशीनचे प्रोग्रॅम सर्व पक्षांना दाखवावेत, अन्यथा मतचोरी थांबणार नाही.
Solapur, 02 November : बिहारच्या निवडणुकीत 30 टक्के मतांच्या जोरावर भारतीय जनता पार्टी सत्तेवर आलेली असेल आणि 70 टक्के मतदान घेऊनही विरोधकांचा पराभव झालेला असेल, असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी मतदानाच्या अगोदरच वर्तविले आहे. त्यासाठी त्यांनी ईव्हीएममधील घोळाचा आधार घेतलेला आहे.
मतदारयादीतील गैरव्यवहार आणि ईव्हीएमधील मतचोरीचे प्रकार यासंदर्भात माहिती देण्यासाठी आमदार उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्या पत्रकार परिषदेत जानकर यंनी बिहारच्या निकालाबाबत मोठे भाकीत वर्तविले आहे. ते ऐकून इंडिया आघाडीच्या नेत्याची झोप उडण्याची शक्यता आहे.
आमदार जानकर म्हणाले, बिहार विधानसभेच्या निवडणुकीत (Bihar Assembly Election) प्रशांत किशोर यांना चार ते पाच टक्के मते दिली जातील. त्यांच्याकडे राष्ट्रीय जनता दलाची दहा टक्के मते वर्ग केली जातील. तेजप्रताप यादव हे वेगळे लढत आहेत. त्यांनाही पाच टक्के मतं पडणार असतील त्यांना दहा टक्के वर्ग करणार. एकूण मतदान ३० टक्के झाले, तर पाच टक्के मतदान इकडे तिकडे जाईल. उर्वरीत ६५ टक्के मतदानात ३५ टक्के मतदान राष्ट्रीय जनता दलाला दाखवतील आणि भाजपला ३० टक्के मतदान दाखवतील.
राजदचे ५० उमेदवार हे लाखाच्या फरकाने निवडून आणतील. पण भारतीय जनता पार्टी आपले उमेदवार दहा ते वीस हजाराच्या फरकाने निवडणूक जिंकल्याचे दाखवतील. पण, सत्तेचे ११५ ते १२० आमदारांचे गणित जुळविणारे असेल. अशा पद्धतीचा प्रोग्रॅम त्यांनी बिहारमध्ये तयार केलेला असणार आणि ‘फक्त ३० टक्के मतं घेऊनही भाजप सत्तेवर’ असे चित्र निकालाच्या दिवशी रंगवलेले असेल. भाजपकडे अनेक कल्पना आहेत, त्यांच्याकडे अनेक बुद्धीवान लोक आहेत, असा दावा जानकर यांनी केला आहे.
उत्तम जानकर म्हणाले, राहुल गांधी, शरद पवार आणि राज ठाकरे यांनाही मी सांगितले आहे की, मतदान सुरू होण्याआधी जो मॉकपोल दिला जातो, तो बनावट आहे. तो काही सत्याचा प्रमाण नाही. जेव्हा प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात होते. त्या वेळच्या पाच मशीन्स बाजूला काढून ठेवाव्यात, त्या ठिकाणी पाच टक्के मशीन पर्यायी उपलब्ध असतात.
एका मतदारसंघात ३५ मशीन असतात.मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या मशीन्स बाजूला ठेवा. त्या मशीनमधील प्रोग्रॅम दाखवा. त्याचा डिस्लपे आम्हाला लॅपटॉप किंवा स्क्रीनवर द्या. पण तुम्ही आम्हाला मतदान यंत्रातील प्रोग्रॅमच दाखवत नाही. आतला सर्व प्रोग्रॅम सर्व पक्षांना दिला पाहिजे. तुम्ही जोपर्यंत प्रोग्रॅम दाखवत नाही तोपर्यंत मतचोरीचे अनेक प्रकार केली जातील, असेही जानकर यांनी म्हटले आहे.
जानकर म्हणाले, बिहारमध्ये ३० टक्के मतं घेऊन भाजप सत्तेवर येईल. पण ३५ टक्के मतदान घेणारी राष्ट्रीय जनता दलाचा पराभव झालेला असेल. कारण भाजपकडे बुद्धीमान लोक काही कमी नाहीत. मी राहुल गांधींना सांगितलेले आहे की, पाच पेट्यांची मागणी करा. पूर्वी कोर्ट सुप्रीम होतं. पण आता कोर्ट सुप्रीम राहिलेले नाही. सर्वोच्च कोर्टालाच या निवडणूक प्रक्रियेच्या पॅनेलमधून बाहेर काढले आहे.
Q1. उत्तम जानकर यांनी बिहार निवडणुकीबाबत काय भाकीत केले?
A1. त्यांनी सांगितले की ३०% मतांवर भाजप सत्तेवर येईल आणि विरोधकांचा पराभव होईल.
Q2. त्यांनी कोणत्या कारणाचा आधार घेतला?
A2. त्यांनी ईव्हीएममधील घोळ आणि मतदारयादीतील गैरव्यवहाराचा आधार घेतला.
Q3. जानकर यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी काय सुचवले?
A3. मतदान मशीनचा आतला प्रोग्रॅम सर्व पक्षांना दाखवावा, असे त्यांनी सांगितले.
Q4. जानकर यांनी कोणत्या नेत्यांना सूचना दिल्या?
A4. त्यांनी राहुल गांधी, शरद पवार आणि राज ठाकरे यांना ईव्हीएम पारदर्शकतेबाबत सावध राहण्याचे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.