Vishal Patil : कोण अधिक तरूण? खासदार विशाल पाटलांना 'या' आमदाराचा चिमटा, बैठकीत एकच हशा!

MLA Rohit Patil On MP Vishal Patil : कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाच्या उंची वाढविण्याचा घाट घातला आहे. यासाठी दिल्लीत बैठक झाली असून त्याला मंजूरी मिळण्याची शक्यता आहे.
MP Vishal Patil
MP Vishal Patilsarkarnama
Published on
Updated on

Sangli News : कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाच्या उंची वाढविण्याचा घाट घातला असून ती पाच मीटरने वाढवली जाणार आहे. यामुळे अलमट्टीची पाणी पातळी शिरोळ बंधार्‍यापर्यंत पोहोचणार आहे. तर पावसाळ्यात सांगली व कोल्हापूर हे दोन्ही जिल्हे पाण्याखाली जाण्याची भीती आत्ताच व्यक्त केली जातेय. दरम्यान आता या निर्णयाला सांगलीतील लोकप्रतिनिधींनी विरोध केला असून लढा उभारला जाणार आहे. याबाबत जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आणि पूरग्रस्तांबरोबरच खासदार विशाल पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अरुण लाड, आमदार रोहित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. याच बैठकीतील सध्या एक किस्सा जिल्ह्याच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावर कर्नाटक सरकार ठाम असून नुकताच काँग्रेस नेते तथा उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत त्यांनी अलमट्टी धरणाची उंची 519 वरून 524 मीटर करण्यासाठी केंद्राने मंजूरी द्यावी, त्यासाठी अधिसूचना काढावी, अशी विनंती केली आहे. यावर आता पुढच्या पंधरा दिवसात बैठक लागणार असून मंजूरी मिळण्याची शक्यता आहे.

मात्र आता यानिर्णया विरोधात सांगली जिल्ह्यातील नेते एकत्र आले आहेत. खासदार विशाल पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अरुण लाड, आमदार रोहित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत उंचीला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आता याच बैठकीत आमदार रोहित पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांचा काढलेल्या चिमट्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

MP Vishal Patil
Vishal Patil BJP Offer : चंद्रकांतदादांच्या भाजप प्रवेशाच्या गुगलीवर विशाल पाटलांचा सिक्सर; म्हणाले, "मी आता कायद्यानेच..."

या बैठकीत आमदार रोहित पाटील यांनी तारुण्यावरून खासदार विशाल पाटील यांना चिमटा काढला. रोहित पाटील यांनी, विशाल पाटील तरूण दिसतात. पण ते तरूण नाहीत.... येथे मी एकटाच तरूण आहे, असे वक्तव्य केल्याने एकच हशा पिकला होता. या बैठकीत अलमट्टी उंची बाबतच्या विरोधावरून वातावरण तंग झाले होते. पण रोहित पाटील यांनी तारुण्यावरून विशाल पाटील यांचा चिमटा काढल्याने वातावरण ह लके पुलके झाले.

दरम्यान आमदार अरुण लाड यांनी धरणाच्या उंची विरोधात लोकप्रतिनिधी, व्यापारी, शेतकरी यांच्यातर्फे लढा उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली. लाड यांनी लढ्यासाठी पुढाकार घेतला असून आज (दि. 8) याबाबत बैठक घेण्यात येईल असे म्हटलं होतं.

MP Vishal Patil
Vishal Patil : वसंतदादांच्या वारसांनी कारखाना राखला! निवडणूक बिनविरोध; आता दादांची चौथी पिढीही राजकारणात

तर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन, अलमट्टी धरणाची उंची 519 वरून 524 मीटर करण्याचे जाहीर केले आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील यांच्याशी चर्चाही केली आहे. आता केंद्राकडूनही याला मान्यता दिली जाईल. पण आताही महाराष्ट्राने विरोध केला नाही तर 2017, 2019 व 2022 प्रमाणे चित्र निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. महापुरामुळे कोल्हापूर, सांगली, इचलकरंजीसह अनेक लहान-मोठी नदीकाठची गावे पाण्याखाली जातील, असा दावाही लाड यांनी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com