Rohit Pawar : शिखर बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून रोहित पवार दोषमुक्त; विशेष न्यायालयाने निर्णय देताच म्हणाले, "घातक हूँ"..!

rohit pawar on mscb scam case : राज्याची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून आमदार रोहित पवार यांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे.
Rohit Pawar
Rohit Pawarsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात रोहित पवार यांना विशेष न्यायालयाने दोषमुक्त केले.

  2. या निर्णयानंतर त्यांनी आक्रमक भूमिका घेत तीव्र प्रतिक्रिया दिली.

  3. या निकालामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.

Pune News : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून विशेष न्यायालयाने दोषमुक्त केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे रोहित पवार यांना निर्दोष मुक्त केले आहे. या निकालानंतर रोहित पवार आक्रमक पवित्रा घेत “घायल हूँ, इसलिए घातक हूँ” असा थेट इशाराच दिला आहे.

राज्याची शिखर बँक मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात विशेष सत्र न्यायालयाने रोहित पवार यांच्यासह इतर आरोपींना दिलासा दिला. आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या मूळ गुन्ह्याचा तपास बंद करत सादर केलेला अहवाल न्यायालयाने मान्य केल्याने या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला आहे.

या निर्णयानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना न्यायालयावर विश्वास व्यक्त करत. “न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास होता आणि आहे. ‘सत्य परेशान हो सकता है, मगर पराभूत नहीं’ हे पुन्हा सिद्ध झालं,” असे ते म्हणाले.

Rohit Pawar
'भागवत संप्रदाय संपला पाहिजे हा भाजपचा प्रयत्न' Rohit Pawar यांचा भाजपवर आरोप ।Nashik News

तसेच “या प्रकरणात जो नाहक त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागला, त्यानंतर आता पुढच्या पावलांबाबत एवढंच सांगतो. ”घायल हूँ, इसलिए घातक हूँ,” असे म्हणत त्यांनी सरकारला अप्रत्यक्ष इशारा दिला.

दरम्यान, या प्रकरणात ईडी ने दाखल केलेल्या आरोपांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आर्थिक गुन्हे शाखेचा तपास बंद झाल्यानंतर ईडीचे प्रकरण टिकू शकत नाही, असा मुद्दा रोहित पवार यांनी न्यायालयात मांडला होता, जो अखेर ग्राह्य धरला गेला.

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश महेश जाधव यांनी रोहित पवार, त्यांचे सहकारी राजेंद्र इंगवले आणि इतर आरोपींचे अर्ज मंजूर करत त्यांना दोषमुक्त केले. त्यामुळे अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणावर पडदा पडला असला, तरी आता या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडींची शक्यता वर्तवली जात आहे.

Rohit Pawar
Rohit Pawar : अजितदादांची शेवटची इच्छा पूर्ण होणार; 9 तारखेनंतर राजकीय चर्चेला सुरुवात...; रोहित पवारांनी सगळं सांगितलं

FAQs :

1. रोहित पवार कोणत्या प्रकरणात दोषमुक्त झाले?
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) घोटाळा प्रकरणात ते दोषमुक्त झाले.

2. निर्णय कोणी दिला?
विशेष सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला.

3. या निर्णयानंतर रोहित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली?
त्यांनी “घायल हूँ, इसलिए घातक हूँ” असा आक्रमक इशारा दिला.

4. हा घोटाळा कोणत्या संस्थेशी संबंधित आहे?
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेशी संबंधित आहे.

5. या निकालाचा राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून विरोधक आणि समर्थकांमध्ये चर्चा वाढू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com