Rohit Pawar News : रोहित पवारांनी शाहांचा पुढचा डावच सांगितला; म्हणाले,'फडणवीसांनाच पुन्हा CM करुन शिंदेंना ते...'

Rohit Pawar on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात अडचणीत आणले होते. भाजपच पक्ष आणि घर फोडण्यास कारणीभूत आहे. सिंचन घोटाळा प्रकरणी 2014 आणि 2019 ला याच मुद्द्याचा जोरदार वापर करून ते सत्तेत आले होते.पण ज्या ज्यावेळी भाजप सत्तेत येतं, तेव्हा महाराष्ट्राची वाट लागते.
Rohit pawar, amit shah, eknath shinde, Devendra fadnavis
Rohit pawar, amit shah, eknath shinde, Devendra fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Karmala News : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले आहे. मतदानाची तारीख जवळ येत असतानाच राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. यातच रोज नवे हेवेदावेही महाविकास आघाडी आणि महायुतीसह इतर पक्षांच्या राजकीय नेतेमंडळींकडून केले जात आहे.

आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेड मतदारसंघाचे उमेदवार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी खळबळजनक दावा केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीचा हा दावा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे करमाळा येथे प्रचारासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले, महायुतीतील भाजपला अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या जागा कमी आणून त्यांच्या स्वत:च्या जागा वाढवायच्या आहेत. शिंदेंच्या शिवसेनेच्या जागा कमी केल्याचा फायदा आमच्या महाविकास आघाडीला होणार आहे.

तसेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा चेहरा पुढे केल्यास पाच ते सात टक्के मते कमी होतील. अमित शाह यांचा या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचा डाव असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता बस झालं असं सांगण्यात येत असल्याचं मोठं विधानही आमदार रोहित पवारांनी यावेळी केलं.

Rohit pawar, amit shah, eknath shinde, Devendra fadnavis
Sada Sarvankar Video : मोठी बातमी!...तर सदा सरवणकर उमेदवारी अर्ज मागे घेणार

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात अडचणीत आणले होते. भाजपच पक्ष आणि घर फोडण्यास कारणीभूत आहे. सिंचन घोटाळा प्रकरणी 2014 आणि 2019 ला याच मुद्द्याचा जोरदार वापर करून ते सत्तेत आले होते.पण ज्या ज्यावेळी भाजप सत्तेत येतं, तेव्हा महाराष्ट्राची वाट लागते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आमच्या महाविकास आघाडीच्या 170 ते 180 जागा येतील असं भाकितही रोहित पवारांनी यावेळी केलं आहे.

राज्यातील महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी बरेच उमेदवार झाल्याने येत्या दोन दिवसांत तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते बंडखोरी कमी करुन एका ठिकाणी एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न करतील असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.याचवेळी विधानसभेच्या निवडणुकीत प्रत्येकाला महाविकास आघाडीच जिंकवणार असल्याची खात्री असल्यानं जास्तीत जास्त उमेदवारांनी महाविकास आघाडीतून उमेदवारी दाखल केल्याचा दावाही रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

Rohit pawar, amit shah, eknath shinde, Devendra fadnavis
Jarange Factor : धसका कायम...जरांगेंच्या भेटीसाठी सोलापुरातील पाच उमेदवारांची अंतरवाली सराटीची वारी!

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी अशा चक्रव्यूहामध्ये अडकवल्याने जनता त्रासून गेली आहे.जनतेला चक्रव्यूहामध्ये नेणारे ते अभिमन्यू आहेत, असा चिमटाही रोहित पवार यांनी काढला.

आरक्षणासाठी मोठा लढा उभारलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या राजकीय रणनीतीवर व उमेदवार देण्यावरुनही रोहित पवार यांनी अतिशय सावध भूमिका घेतली. ते म्हणाले, ते सामाजिक कार्यकर्ते असून तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे.इतर पक्षाबाबत आम्ही बोललो असतो.मात्र, सामाजिक कार्यकर्त्यावर आम्ही काही बोलू शकत नाही असं पवार यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com