
Satara, 10 February : माझ्यावर आणि गोविंद डेअरीवर इनकम टॅक्स विभागाच्या छापेमारीमागे राजकारण आहे की नाही, याबाबत मला माहिती नाही. पण, सद्याचे वातावरण काय चाललंय, हे वेगळे सांगायची गरज नाही, असे सूचक विधान सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले. तसेच, माझ्याकडे आणि माझ्या मुलाकडे दोन लाख ३५ हजार रुपये एवढीच रक्कम त्यांना सापडली. दागिन्याच्या स्वरूपात काही सोनंही होतं. मात्र, ते नियमांत असल्यामुळे त्यांनी ती रोख रक्कम आणि सोनं आम्हाला परत केले, असेही निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळक यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर (Sanjeevraje Naik Nimbalkar) आणि गोविंद डेअरीचे इतर संचालकांची प्राप्तीकर विभागाकडून पाच फेब्रुवारीपासून दहा फेब्रुवारीपर्यंत तपासणी आणि चौकशी केली. इनकम टॅक्स विभागाची ही छापेमारी अखेर रविवारी (ता. 09 फेब्रुवारी) पाचव्या दिवशी संपली. त्यानंतर ते आज माध्यमांशी बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी ही छापेमारी झाली आहे, त्यामागे काही राजकारण आहे की नाही, हे मला माहिती नाही. पण, इनकम टॅक्सचे (Income Tax) अधिकारी अभ्यास करून छापेमारीसाठी येतात. पण, आमच्याकडं येताना प्राप्तीकर विभागाचा अभ्यास बहुतेक चुकलेला दिसत आहे, असा टोलाही संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी लगावला.
निंबाळकर म्हणाले, छापेमारी पाच दिवस म्हणण्याच्या ऐवजी पहिल्याच दिवशी सर्व विषय प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना समजले होते आणि संपलेही होते. वास्तविक पाच तारखेपासून त्यांना पेपर वर्क करायला जास्त वेळ गेला. जे काही पहायचे होते, त्यांनी ते पाहिले. जे काही ताब्यात घ्यायचे होते, ते त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेतले होते. जे जबाब त्यांना पाहिजे होते, ते त्यांना दिले. त्यामुळे त्यांनी रोख रक्कम आणि दागिने त्यांनी मला परत दिले.
गोविंद मिल्क प्रॉडक्टचे अकाउंटस त्यांना तपासायचे होते, त्यात त्यांचा थोडा फार वेळ गेला. त्यानंतर दोन ते तीन दिवस कागदपत्रांच्या लिखापढीमध्येच गेले. कागदपत्रांची पूर्ण कराव्या लागतात, त्यात त्यांचा जादा वेळ गेला.
माझ्या घरी किंवा गोविंद डेअरी येथे काहीही जप्त केलेले नाही.विशेषत गोविंद डेअरीचे कामकाज समाधानकारक असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांच्या नियमानुसार सर्व काही असल्यामुळे त्यांनी आमच्याकडून काहीही जप्त करून नेलेले नाही. प्राप्तीकर अधिकाऱ्यांकडून आम्हाला अथवा आमच्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. आम्ही ज्या प्रमाणे सहकार्य केले. त्याप्रमाणे त्यांचीही वर्तणूक होती, असेही संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
दरम्यान, माजी आमदार दीपक चव्हाण व राजेगटाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते रात्रंदिवस संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी पाठिंबा देण्यासाठी ठाण मांडून बसले होते. इनकम टॅक्सची छापेमारी झाल्याने कार्यकर्त्यांना चिंतेचे वातावरण होते. मात्र, संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी काहीही जप्त केलं नाही, अधिकाऱ्यांकडून चांगली वागणूक मिळाली, असे कार्यकर्त्यांना सांगितल्यानंतर कार्यकर्ते तेथून निघून गेले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.