SadaBhau Khot News : सदाभाऊ खोतांनी केली भाजपची गोची? धैर्यशील मानेंसमोरच केलं मोठं विधान

Islampur News : सांगलीच्या इस्लामपूरमध्ये शेतकरी कामगार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला बावनकुळे, धैर्यशील माने अन् खोत उपस्थित होते.
SadaBhau Khot dhairyasheel mane
SadaBhau Khot dhairyasheel manesakarnama
Published on
Updated on

राज्यातील शेवटच्या म्हणजे 48 व्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ( Hatkanangale Lok Sabha Constituency ) यंदा जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार ठरला नाही, पण शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे आव्हान असणार आहे. अशातच रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot ) यांनी केलेल्या एका मागणीमुळे भाजपची गोची होण्याची शक्यता आहे.

SadaBhau Khot dhairyasheel mane
Shahu Maharaj : शाहू महाराजांनी महाआघाडीच्या चर्चेतील हवाच काढली; लोकसभा उमेदवारीबाबत म्हणाले...

सांगलीच्या इस्लामपूरमध्ये शेतकरी कामगार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने आणि महायुतीच्या घटक पक्षांतील नेते उपस्थित होते. या वेळी सदाभाऊ खोतांनी धैर्यशील मानेंसमोर हातकणंगले मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी बावनकुळेंकडे केली आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. ( sadabhau khot demand Hatkanangale Lok Sabha Constituency ticket )

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सदाभाऊ खोत म्हणाले, "आगामी लोकसभा निवडणुकीत ( Lok Sabha Election 2024 ) हातकणंगले मतदारसंघातून मला उमेदवारी मिळावी. 2019 मध्ये मला उमेदवारी मिळणार होती. पण, ऐनवेळी हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला."

SadaBhau Khot dhairyasheel mane
Sangli Politics : सांगलीत भाजपचाच विजय, पण उमेदवार...; संजयकाकांचं मोठं वक्तव्य

"हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा बहुजनांचा होईल. मलादेखील खासदार व्हायचं होतं. त्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मी रान तयार केलं. त्याची पेरणीदेखील केली. परंतु, ही जागा शिवसेनेकडे देण्यात आली. वळवाचा पाऊस पडल्यासारखं धैर्यशील माने आले आणि ते खासदार झाले. मलादेखील खासदार व्हायचं आहे. त्यामुळे धैर्यशील माने तुम्ही आता थांबता का बघा. आपल्या दोघांत आता पैरा फेडण्याची वेळ आली आहे. मला तिकीट मिळालं, तर तुम्ही माझ्या पाठीशी राहा. तुम्हाला तिकीट मिळालं तर मी तुमच्या पाठीशी राहतो," असं सदाभाऊ खोतांनी म्हटलं.

SadaBhau Khot dhairyasheel mane
Devendra Fadnavis News : आंधळीतून देवेंद्र फडणवीस फुंकणार सातारा, माढाचे रणशिंग

"लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार बहुजनांचा असल्याने त्यांनी ठणकावून सांगितलं. पक्षाकडून आम्हाला शेत नांगराला लावलं जातं. खुरपायला लावलं जातं, पण ऐनवेळी पीक मात्र दुसराच घेऊन जातो. आम्हाला मात्र बांधावरच बसावं लागतं. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न मांडण्यासाठी आता मलादेखील खासदार व्हायचं आहे. मलादेखील दिल्लीत जाऊन पाहू दे तिथे काय आहे," असं सदाभाऊ खोत म्हणाले.

महायुतीतील शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादीचं जागावाटप अद्याप ठरलं नाही. अशातच सदाभाऊ खोतांनी थेट बावनकुळेंकडे हातकणंगले मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली आहे. खोतांच्या मागणीमुळे भाजपपुढे पेच निर्माण झाला आहे. तसेच, महाविकास आघाडीकडून हातकणंगले मतदारसंघात अजूनही उमेदवार ठरला नाही. महाविकास आघाडीनं ही जागा राजू शेट्टींसाठी सोडल्याची चर्चा होती. पण, शेट्टींनी 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात शेट्टी विरुद्ध खोत की शेट्टी विरुद्ध माने, असा सामना रंगणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान, 2019 मध्ये राष्ट्रवादीनं आपल्या कोट्यातील जागेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींना पाठिंबा दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादीत असलेल्या धैर्यशील मानेंनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर माने गट, शिवसेनेची ताकद आणि कारखानदारांच्या छुप्या मदतीच्या जोरावर धैर्यशील मानेंनी 96 हजार मतांनी राजू शेट्टींना पराभूत केलं होतं.

SadaBhau Khot dhairyasheel mane
Solapur Politics : शहाजीबापू अन्‌ आवताडेंना सावंतांचा सूचक इशारा; बाबासाहेब देशमुख, भालकेंचे केले कौतुक!

2019 चा निवडणूक निकाल -

धैर्यशील माने ( शिवसेना ) - 5,85, 776

राजू शेट्टी (स्वाभिमानी) - 4,89,737

(Edited By : Akshay Sabale )

R

SadaBhau Khot dhairyasheel mane
Raju Shetti : प्रसंगी रक्ताचे पाट वाहतील, पण..! राजू शेट्टींनी कोणाला दिला इशारा?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com