Sadabhau on Baba Adhav : बाबा आढावांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आगीत तेल कोण ओततंय, हे महाराष्ट्र चांगलाच ओळखतो; सदाभाऊंनी निशाणा साधलाच

EVM machine Issue : मुळात ईव्हीएम मशीन हे काँग्रेस पक्षाच्या काळात आलं. त्या काळात बाबा आढाव यांना हे ईव्हीएम मशीन योग्य दिसत होतं का, हा एक मला पडलेला प्रश्न आहे, असा सवाल आमदार सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे.
Baba Adhav-Sadabhau Khot
Baba Adhav-Sadabhau KhotSarkarnama
Published on
Updated on

Sangli, 01 December : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या आंदोलनाला भेटी द्यायला येणारे नेते पाहिले तर निश्चितपणाने आगीत तेल कोण ओततंय, हे महाराष्ट्र चांगला ओळखतो, अशा शब्दांत माजी राज्यमंत्री, आमदार सदाभाऊ खोत यांनी नाव न नेता महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. आता खोतांचा रोख नेमका कोणाकडे होता, हे मात्र गुलदस्त्यात राहिले आहे.

विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम घोटाळ्याच्या विरोधात तीन दिवस आत्मक्लेष आंदोलन केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लिंबपाणी पिऊन त्यांनी शनिवारी (ता. 30 नोव्हेंबर) आपले आत्मक्लेष आंदोलन मागे घेतले. तत्पूर्वी डॉ. आढाव यांच्या आंदोलनाला ज्येष्ठ नेते शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि स्थानिक काँग्रेस नेत्यांनी भेटी दिल्या. आढाव यांच्या त्या आंदोलनावर खोत यांनी टीकास्त्र सोडले आहे.

सदाभाऊ खोत म्हणाले, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्याबाबत माझ्या मनात नितांत आदर आहे. श्रमिकांसाठी त्यांनी राज्यात अनेक आंदालने केली आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून दिला. पण, आढाव यांनी काल जे ईव्हीएम मशीनच्या विरोधात आत्मक्लेष आंदोलन केले, त्या आंदोलनामुळे माझ्यासारख्या चळवळीतील कार्यकर्त्याच्या मनात काही शंका निर्माण झाल्या आहेत.

Baba Adhav-Sadabhau Khot
Maharashtra Politic's : मुख्यमंत्र्यांसोबत भाजपचे हे 13 आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ; दोन महिला आमदारांचाही समावेश!

मुळात ईव्हीएम मशीन हे काँग्रेस पक्षाच्या काळात आलं. त्या काळात बाबा आढाव यांना हे ईव्हीएम मशीन योग्य दिसत होतं का, हा एक मला पडलेला प्रश्न आहे, असा सवाल आमदार सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे.

खोत म्हणाले, दुसऱ्या बाजूला विधानसभा निवडणुकीत आपण पाहिलं तर मुस्लीम बहुल भागातील मतं ही महायुतीच्या विरोधात पडलेली दिसून येत आहेत. मुस्लिम बहुल भागातील ईव्हीएम मशीन ही योग्य पद्धतीने चालली होती का?. त्या मशीनला गडबड करावी, असं का वाटलं नाही? म्हणजेच याचा अर्थ सरळ आहे की, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाविकास आघाडी ही महायुतीच्या विरोधात वातावरण निर्माण करत आहे, हे आता यातून स्पष्ट झालेले आहे.

Baba Adhav-Sadabhau Khot
Pune Crime News : शिंदेसेनेतील माजी उपसरपंचांचा प्राणघातक हल्ल्यात मृत्यू....

महाविकास आघाडीच्या नेत्यावरही सदाभाऊ खोत यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या आंदोलनाला भेटी द्यायला येणारे नेते पाहिले तर निश्चितपणाने आगीत तेल कोण ओततंय, हे महाराष्ट्र चांगला ओळखतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com