Pune Crime News : शिंदेसेनेतील माजी उपसरपंचांचा प्राणघातक हल्ल्यात मृत्यू....

Deadly Attack On Deputy Sarpanch : गिलबिले यांच्या मानेवर आणि पाठीवर गंभीर स्वरुपाचे वार करण्यात आले आहेत. या हल्ल्यात गिलबिले हे गंभीर जखमी झाले होते. हल्ल्यानंतर हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे.
Dattatray Gilbile
Dattatray GilbileSarkarnama
Published on
Updated on

Pune, 01 December : शिरूर तालुक्यातील शिक्रापूरच्या माजी उपसरपंचांवर धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला करण्यात आला असून उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ही घटना रविवारी (ता. ०१ डिसेंबर) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास शिक्रापूर येथे घडली आहे. या घटनेमुळे शिक्रापुरात खळबळ उडाली आहे.

दत्तात्रय गिलबिले असे प्राणघातक हल्ल्यात मृत्यू झालेल्या उपसरपंचांचे (Deputy Sarpanch) नाव आहे. या प्रकरणी त्यांची पत्नी रोहिणी दत्तात्रेय गिलबिले यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी निष्पन्न झाला आहे. पोलिस त्याच्या मागावर असल्याचे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले.

दत्तात्रेय गिलबिले हे आज दुपारी सव्वा बाराच्या सुमारास त्यांच्या घरी होते. त्या वेळी अज्ञात आरोपीने त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला. गिलबिले यांच्या मानेवर आणि पाठीवर गंभीर स्वरुपाचे वार करण्यात आले आहेत. या हल्ल्यात (Attack) गिलबिले हे गंभीर जखमी झाले होते. हल्ल्यानंतर हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे.

Dattatray Gilbile
Rajendra Raut : बार्शीतील पराभवाचे राजेंद्र राऊतांनी सांगितले कारण...

जखमी अवस्थेतील गिलबिले यांना तातडीने गावातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना पुण्याला हलविण्यास सांगितले. त्यांना पुण्याला नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे.

या प्रकरणी दत्तात्रेय गिलबिले यांची पत्नी रोहिणी यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी निष्पन्न झाला असून पोलिस त्याच्या मागावर आहेत. हल्ल्याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेमुळे शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Dattatray Gilbile
Yugendra Pawar : अजितदादांना मिळालेल्या मतांवर आक्षेप घेत युगेंद्र पवारांचा मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज

दरम्यान, दत्तात्रेय गिलबिले हे २०१५ ते १६ या वर्षात शिक्रापूरचे उपसरपंच होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाणे पसंत केले होते. तेव्हापासून ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते. विधानसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीचे काम केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com