Maharashtra Politic's : मुख्यमंत्र्यांसोबत भाजपचे हे 13 आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ; दोन महिला आमदारांचाही समावेश!

Mahayuti Government : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत मित्रपक्षांसह भाजपचे काही आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील, असे सांगण्यात येत आहे. भाजपचे तब्बल दहा ते पंधरा आमदार मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे.
Mahayuti Government
Mahayuti Government Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 01 December : महायुतीच्या मुख्यमंत्र्यांचा येत्या पाच डिसेंबर रोजी मुंबईत शपथविधी होणार आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री कोण होणार, याची उत्सुकता आहे. मुख्यमंत्र्यांसोबत भाजपचे दहा ते पंधरा ज्येष्ठ आणि तरुण आमदार शपथ घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांची नावेही पुढे आली आहेत.

विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला (mahayuti) मोठे बहुमत दिले आहे. त्यातही भारतीय जनता पक्षाचे 132 आमदार निवडून आले आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महायुतीला भक्कम असे बहुमत मिळाले आहे.

दरम्यान, गेली नऊ दिवसांपासून मुख्यमंत्रिपदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे आता राज्यात भाजपचाच (BJP) मुख्यमंत्री होणार, हे स्पष्ट झाले आहे. बहुतांश आमदारांचे देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर एकमत असले तरी मोदी शहा यांच्या धक्कातंत्राचा अनुभव पाहता नवे नावही पुढे येऊ शकते.

Mahayuti Government
Pune Crime News : शिंदेसेनेतील माजी उपसरपंचांचा प्राणघातक हल्ल्यात मृत्यू....

एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद देऊ करण्यात आलेले आहे. मात्र, उपमुख्यमंत्रिपदासह गृहमंत्रिपदाची मागणीही शिंदे यांच्याकडून करण्यात आलेली आहे. भाजप गृहमंत्री सोडण्यास तयार नाही, त्यामुळे खाते वाटपाचा तिढा कायम आहे. मात्र भाजपच्या मुख्यमंत्र्यांसोबत अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत मित्रपक्षांसह भाजपचे काही आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील, असे सांगण्यात येत आहे. भाजपचे तब्बल दहा ते पंधरा आमदार मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे, त्या संभाव्य नावाची यादीही जाहीर झाली आहे. त्यात काही ज्येष्ठ आणि तरुण आमदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

Mahayuti Government
Rajendra Raut : बार्शीतील पराभवाचे राजेंद्र राऊतांनी सांगितले कारण...

मुख्यमंत्र्यांसोबत ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, मंगलप्रभात लोढा, अतुल सावे, आशिष शेलार, नीतेश राणे, गोपीचंद पडळकर, संजय कुटे यांची नावे मंत्रिपदासाठी आघाडीवर आहेत. याशिवाय महिला आमदारांमध्ये पंकजा मुंडे आणि देवयानी फरांदे यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com