Jaykumar Gore : साहेब, महापौर 100 टक्के भाजपचाच होणार, पण तेवढा संकल्प करा : पालकमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना जाहीर साकडं

Solapur Corporation Election 2026 : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोलापूर शहर दत्तक घेऊन विकास व पायाभूत सुविधांना सातत्याने पाठबळ देण्याचे साकडे घातले.
Devendra Fadnavis-Jaykumar Gore
Devendra Fadnavis-Jaykumar GoreSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 10 January : साहेब, सोलापूर शहर हे भारतीय जनता पक्षासोबतच आहे. शहराचा महापौर शंभर टक्के भाजपचाच होणार आहे. पण, शहराला विकासासाठी दत्तक घेण्याचा आणि पायाभूत सुविधांना आतापर्यंत दिलेले बळ यापुढेही देण्याचा संकल्प आपण करावा, अशी विनंती करतो, असे साकडे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जाहीर व्यासपीठावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातले.

सोलापूर महापालिका निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आज (ता. 10 जानेवारी) शहरातील हरिभाई प्रशालेच्या मैदानावर जाहीर सभा झाला. त्या सभेत बोलताना पालकमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी सोलापूर शहर विकासासाठी दत्तक घ्यावे, अशी विनंती केली.

जयकुमार गोरे (Jaykumar Gore) म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीससाहेब, आपण सोलापूर शहराला दिलेला शब्द पाळला. विमानसेवा सुरू केली. सोलापुरातून गोवा, मुंबई विमानसेवा सुरू झाली आहे. आता सोलापूर ते तिरुपती बालाजी आणि बेंगलोर अशी विमानसेवा सुरू करावी. शहराला दररोज पाणी देण्यासाठी 863 कोटी रुपयांची योजना टेंडरमध्ये आहे. ती लवकरात लवकर पूर्ण करावी. आयटी पार्कला मंजुरी दिली आहे, आयटी पार्कचे काम लवकर चालू व्हावे, अशी आमची मागणी असणार आहे.

रोजगारासाठी सोलापूर शहरातून मोठ्या प्रमाणात इतर शहरात स्थलांतर झाले आहे. त्या विस्थापितांना पुन्हा शहरात आणण्यासाठी कुंभारी आणि अन्य एमआयडीसींचं विस्तारीकरण करावं लागणार आहे. इचलकरंजीत ज्या प्रमाणे यंत्रमागचालकांना सवलती दिल्या, तशाच सवलती सोलापूरला मिळाव्यात. तसेच यंत्रमागधारकांना विजबिलात सवलत मिळावी, अशाही मागण्या गोरे यांनी मुख्यमंंत्र्यांकडे केल्या आहेत.

Devendra Fadnavis-Jaykumar Gore
Fadnavis Solapur Tour : फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या अस्मितेला घातला हात...

जयकुमार गोरे म्हणाले, लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्यासाठी अनेकजण पुढं येतात. पण, त्या योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बळ दिले आहे. सखा भाऊ वर्षातून एकदा ओवाळणी करतो, पण आमचा देवाभाऊ प्रत्येक महिन्याला ओवाळणी पाठवतो, त्यामुळे लाडक्या बहिणींनी भाजपला मदत करावी.

Devendra Fadnavis-Jaykumar Gore
Devendra Fadnavis : फडणवीसांचा घोषणांचा पाऊस; सोलापूर वाढवण बंदराशी जोडणार, दररोज पाणी अन्‌ यंत्रमागधारकांसाठी ‘इचलकरंजी पॅटर्न’

सोलापूर शहर भाजपसोबत आहे. शहराचा महापौर शंभर टक्के भाजपचाच होणार आहे, त्यामुळे सोलापूर शहराला विकासासाठी दत्तक घ्यावे. आपण सोलापूरसाठी केलेल्या कामाबाबत आम्ही सर्वजण तुमचे ऋणी आहोत, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com