
Sahyadri Sugar Factory Election : सातारा, कन्हाड, खटाव, कडेगाव, कोरेगाव या 5 तालुक्यातील 234 गावांत कार्यक्षेत्र असलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकण्यासाठी तिन्ही पॅनेलने चांगलाच जोर लावला आहे. भर उन्हाच्या तडाख्यातही तिन्ही पॅनेलकडून जाहीर प्रचार सभा, वैयक्तिक गाठीभेटीवर भर दिला आहे. एकेका मतासाठी तिन्ही पॅनलच्या उमेदवारांत चढाओढ सुरु आहे. त्यामुळे तिरंगी लढतीमुळे कोण बाजी मारणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. तब्बल २५ वर्षांनी होत असलेल्या या निवडणुकीत कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचे पी. डी. पाटील पॅनल, आमदार मनोज घोरपडे आणि अॅड. उदयसिंह पाटील यांचे (स्व.) यशवंतराव चव्हाण सह्याद्री परिवर्तन आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, निवास थोरात आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ यांच्या यशवंतराव चव्हाण सह्याद्री शेतकरी परिवर्तन पॅनलमध्ये प्रमुख लढत होत आहे.
तिन्ही पॅनेलच्या उमेदवारांन यावेळी एकेका मतासाठी फिल्डिंग लावली आहे. यात पाहुण्यांचाही मोठ्या प्रमाणात मदत घेतली जात आहे. पॅनेल प्रमुख आणि उमेदवार समर्थकांकडे मतदारांची यादी आहे. त्यांच्याकडून कोणत्या गावात कोणाचा कोण पाहुणा याची जंत्री काढण्याचे काम सुरू आहे. एका गावातील पाहुण्यांकडून दुसऱ्या गावातील पाहुण्यांना आपल्याच पॅनेलला मतदान करावे, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहेत.
सह्याद्री कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील मोठ्या गावातील उसाचे क्षेत्रही मोठे आहे. त्यामुळे या गावात मतदारांची संख्याही जास्त आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील हीच मोठी गावे पॅनेल प्रमुख आणि उमेदवारांकडून टार्गेट केली जात आहेत. कऱ्हाड, तांबवे, सुपने, गोवारे, मुंढे, वहागाव, बेलवडे हवेली, तळबीड, चरेगाव, इंदोली, पाल, शिरगाव, पेरले, कोर्टी, उंब्रज, वडोली भिकेश्वर, कोपर्डे हवेली, नडशी, शिरवडे, कोणेगाव, वाघेरी, मसूर, कवठे, कालगाव, किवळ, वाठार किरोली, तारगाव, किरोली, पिंपरी, रहिमतपूर या गावांत 300 च्या वर मतदार आहेत. त्यामुळे संबंधित गावातील जास्तीतजास्त मतदान आपल्याच पॅनेलला, उमेदवाराला मिळावे, यासाठी नेत्यांनी फिल्डिंग लावली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.