साईमंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले पण...

महाराष्ट्राचे ( Maharashtra ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी नवरात्रीपासून ( Navratri ) राज्यातील सर्व मंदिरे खुले करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
saibaba
saibabaSarkarnama
Published on: 
Updated on: 

शिर्डी ( अहमदनगर ) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवरात्रीपासून राज्यातील सर्व मंदिरे खुले करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार राज्यातील मंदिरे खुली होत आहेत. मात्र या मंदिरांतील भाविकांच्या प्रवेशा संदर्भातील निर्णय स्थानिक प्रशासनावर सोडण्यात आला आहे. त्यानुसार शिर्डी व शनिशिंगणापूर येथील मंदिरांतील भाविकांचे प्रवेश खुले झाले असले तरी भाविकांच्या दर्शनावर काही अटी व नियम लावण्यात आले आहेत. Sai Mandir is open for devotees to visit but ...

साईमंदिर भाविकांसाठी गुरूवार (ता. 7) पासून खुले केले जाईल. दररोज पंधरा हजार भाविकांना कोविड नियमांचे पालन साईदर्शन घेता येईल, अशी माहिती साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

saibaba
सरकारने निर्णय न घेतल्यास पुढील महिन्यात शिर्डीतील साईमंदिर खुले करू

बाणाईत म्हणाल्या, साईभक्‍तांना दर्शनाकरीता online.sai.org.in या संकेतस्‍थळावर ऑनलाईन दर्शन पासच आरक्षण करावे लागेल. तसेच जे साईभक्‍त शिर्डी येथे येतील, अशा सर्व साईभक्‍तांना ऑनलाईन दर्शन पासची बुकिंग आपापल्या घरूनच करून यावी लागणार आहे. ऑनलाईन बुकिंग शिवाय भाविकांना प्रवेश मिळणार नाही.

नित्याच्या काकड आरतीनंतर समाधी मंदिर दर्शनाकरीता खुले करण्‍यात येणार असून, सकाळी सहा ते रात्री दहा यावेळेत मंदिर खुले राहिल. प्रत्‍येक तासाला 1150 साईभक्‍तांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. प्रत्‍येक आरतीकरीता एकूण 80 साईभक्‍तांना आरतीसाठी प्रवेश देण्‍यात येईल.

saibaba
शिर्डी देवस्थान पहिल्यांदाच राष्ट्रवादीकडे : आमदार आशुतोष काळेंकडे अध्यक्षपद

त्‍यापैकी प्रत्‍येक आरतीस प्रथम येणाऱ्या शिर्डी ग्रामस्‍थांना दहा पासेस देण्‍यात येतील. ग्रामस्‍थांना दहा आरती पासेस हे साई उद्यान निवासस्‍थान येथून तर दर्शनाचे पासेस मारुती मंदिराशेजारील 16 गुंठे शताब्‍दी मं‍डप येथील काऊंटरवर दिले जातील. ग्रामस्‍थांना मतदान ओळखपत्र व आधारकार्ड शिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच ऑनलाइनद्वारे 20 आरती पासेस, महत्‍वाचे व अतिम‍हत्‍वाचे मान्‍यवर आणि देणगीदार साईभक्‍तांकरीता 50 आरती पासेस दिले जातील.

गर्दी टाळण्‍याकरीता सुरुवातीचे काही दिवस दर गुरुवारची नित्‍याची पालखी बंद राहील. याबरोबरच मंदिरातील साई सत्‍यव्रत पूजा, अभिषेक पूजा, ध्‍यान मंदिर व पारायण हॉल बंद राहतील. दर्शनासाठी भाविकांना दोन क्रमांकाच्या प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जाईल. द्वारकामाई मंदिरातून समाधी मंदिरामधून दर्शन घेऊन गुरुस्‍थान मंदिर मार्गे चार व पाच नंबर दरवाजातून बाहेर पाठविले जाईल. दर्शनरांगेत सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रिनिंग व पाय धुण्‍याची व्‍यवस्‍था केली आहे.

यांना दर्शनाला बंदी

साईमंदिर दर्शनासाठी खुले केलेले आहे. मात्र त्यात नियमावली राहणार आहे. साई मंदिरात गर्भवती महिला, दहा वर्षाखालील मुले व वृध्दांना दर्शन घेता येणार नाही, असेही साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत यांनी दिली.

शिंगणापुरात चौथऱ्यावरील शनिदर्शनाला बंदी

घटस्थापनेच्या दिवशी पहाटे साडेचारच्या आरतीनंतर शनिशिंगणापूर येथील शनिमंदिर सुरु होत आहे. येथील स्वयंभू शनिमूर्तीला स्पर्श नको असल्याने सर्व भाविकांना चौथऱ्या खालूनच दर्शन घ्यावे लागणार आहे. यासह अन्य नियमांच्या सूचना आज जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी विश्वस्त मंडळास दिल्या. आज जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी शिर्डीत घेतलेल्या बैठकीस देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर व कार्यकारी अधिकारी जी. के. दरंदले उपस्थित होते. शिर्डीत फक्त ऑनलाईन पासनुसार दर्शन असले तरी शनिशिंगणापुरात ऑफलाईन दर्शन असणार आहे. चौथऱ्यावर प्रवेश बंद ठेवून सर्वांना खालूनच दर्शन ठेवले आहे. चप्पल महाद्वारापर्यंत आणण्यास परवानगी नाही. याशिवाय मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर ठेवावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.