Emotional Post On Late Ajit Pawar : 'दादा, तुमच्या जाण्याने फरक पडलाय!' अजितदादांच्या विश्वासूची भावनिक पोस्ट, नाराजीच्या चर्चांना उधाण; राष्ट्रवादीत खळबळ

Salim Sarang on Late Ajit Pawar : एकीकडे दिवंगत अजितदादा यांच्यासाठी सुप्रिया सुळे यांनी केलेली पोस्ट राज्यात चर्चेचा विषय ठरली असतानाच राष्ट्रवादीतील बडे नेत्या नेत्याचे पोस्टने मात्र खळबळ उडाली आहे.
Emotional Post; Late Ajit Pawar and Salim Sarang
Emotional Post; Late Ajit Pawar and Salim Sarangsarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात निधन झाले होते. या घटनेला आता 5 महिने होत आहेत. यानंतर आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर “दादा मिस यू” असे कॅप्शन लिहित पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अजित पवार यांच्यासोबतचा एक खास फोटोही त्यांनी शेअर त्यांची आठवणी शेअर केली आहे. पोस्टमुळे कार्यकर्ते आणि समर्थकही भावूक झाले असून सोशल मीडियावर या पोस्टची मोठी चर्चा रंगली आहे. याचवेळी “दादा, तुमच्या जाण्याने फरक पडलाय!” अशा एका पोस्टने मात्र राष्ट्रवादीत खळबळ उडवून दिली असून जी अजित दादांचे विश्वासू सलीम सारंग यांनी केली आहे. सारंग यांच्या भावनिक पोस्टमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहेत.

एकीकडे अजितदादांच्या विमान अपघाताला पाच महिने होत असून अद्याप तापासा बाबत कोणतीच माहिती उघड होताना दिसत नाही. यावरून राज्य सरकारवर विरोधकांकडून टीका होताना दिसत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांच्या या फेसबुक पोस्टने राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. सलीम सारंग यांनी “दादा, तुमच्या जाण्याने फरक पडलाय!” अशी पोस्ट केल्याने राष्ट्रवादीत नाराजीच्या चर्चांना वेग आला आहे.

सलीम सारंग यांनी, दादा, तुमच्या जाण्याने मला फरक पडलाय! आज तुम्हाला जाऊन पाच महिने पूर्ण झाले. काळ पुढे सरकत आहे, पण तुमच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी मात्र दिवसेंदिवस अधिक जाणवते असल्याचे म्हटलं आहे. तर दादा, तुम्ही आमच्यासाठी फक्त पक्षाचे नेते नव्हतात, तर कार्यकर्त्यांचा विश्वास होता. कोणतीही अडचण आली की, आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्याही विनंतीची गरज न्हवती. मात्र आता स्वतःची ओळख सांगावी लागते, भेटीसाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागते, अनेकदा विनंती करावी लागते… आणि एवढं करूनही उत्तर मिळत नसल्याचे खंत व्यक्त केली आहे.

Emotional Post; Late Ajit Pawar and Salim Sarang
Ajit Pawar Death: अजित पवारांच्या निधनावर वादग्रस्त विधान : राष्ट्रवादी काँग्रेसमधून लाडक्या नगरसेवकाची हकालपट्टी

तसेच आपल्या पोस्टमध्ये, तुमच्या नेतृत्वात प्रत्येक कार्यकर्त्याला वाटायचं की, "माझ्या पाठीशी माझा नेता आहे." आज ती भावना हरवत चालली आहे. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा, प्रश्न आणि संवाद याकडे पूर्वीसारखं लक्ष दिलं जात नाही, ही खंत मनात कायम असल्याचेही सलीम सारंग यांनी म्हटले आहे.

तर बैठका होत नाहीत, संवाद कमी झाला आहे, आणि कार्यकर्त्यांचा आवाज वरपर्यंत पोहोचतोय की नाही, हा प्रश्न पडू लागला आहे. दादा, पाच महिने झाले... पण तुमच्या जाण्याने पडलेली ही उणीव आजही भरून निघालेली नाही. तुमच्यासारखा कार्यकर्त्याला नावाने ओळखणारा, त्याला वेळ देणारा आणि त्याच्या पाठीशी निस्वार्थपणे उभा राहणारा नेता आज खूप मिस होतो. दादा, तुमच्या जाण्याने फक्त एक नेता गेला नाही... कार्यकर्त्याला 'आपलं' म्हणणारा माणूस हरपला आहे. दादा तुमच्या पवित्र स्मृतींना विनम्र आदरांजली ! असे सलीम सारंग यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे.

Emotional Post; Late Ajit Pawar and Salim Sarang
Ajit Pawar : मिसिंग लिंकचे उद्‌घाटन : पुणे-मुंबई द्रूतगती मार्गावर वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना अजितदादांची आठवण

या भावनिक फेसबुक पोस्टमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडींविषयी आता तर्क वितर्क लावले जात आहेत. आता सारंग यांच्या नाराजीकडे पक्ष कसे पाहतो, यासह सारंग यांची राजकीय भूमिका आगामी काळात काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com