

Pune, 01 May : अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मिसिंग लिंकचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी करण्यात आले. मात्र, या कार्यक्रमामुळे तसेच सुटीमुळे पुणे-मुंबई द्रूतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. तब्बल तास ते दीड तास वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रकर्षाने आठवणी झाली. दादा असते तर सकाळी सहालाच उद्घाटन झाले असते, लोकांना त्रास होऊ नये म्हणून अजितदादांनी पहाटेच उद्घाटन उरकले असते, अशा प्रतिक्रिया प्रवाशांनी दिल्या आहेत.
दरम्यान, मिसिंग लिंकच्या उद्घाटन कार्यक्रमामुळे वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची माफी मागायची आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
मिसिंग लिंकमुळे प्रवाशांचा सहा किलोमीटरचे अंतर वाचणार आहे. तसेच, अर्धा तास वेळेची बचत होणार आहे. हा मार्ग मुंबईहून खोपोली लोणावळ्याजवळ असलेल्या कुसगावला जोडतो, या मार्गामुळे जुन्या घाट रस्त्यातील ७० वाहतूक विभागली जाणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उभारण्यात आलेल्या या मिसिंग लिंकचे उद॒घाटन आज वाहतुकीच्या वेळीच करण्यात आले.
सलग आलेल्या सुट्यांमुळे घराबाहेर पडलेले नागरिक आणि उद्घाटन कार्यक्रम यामुळे पुणे-मुंबई द्रूतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यात अडकलेल्या प्रवाशांनी अजितदादांची आठवण काढत उद्घाटनाच्या वेळेवरून सरकारला सुनावले आहे.
मुंबईला निघालेल्या एका प्रवाशाने सांगितले की, मी अर्धा तासापासून ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. आणखी अर्धा तास ट्रॅफीक हलायची लक्षणे दिसत नाहीत. कारण मी गुगल मॅपवर मी ट्रॅफिकची स्थिती पाहिली आहे. मिसिंग लिंकचा लोकार्पण सोहळा करतात ना. मला अजितदादा पवारांचं खूप पटतं. लोकांना त्रास होऊ नये, म्हणून ते पुण्यातील सर्व उड्डाणपुलांचं उद्घाटन पहाटे पहाटे सहा वाजता करायचे. मात्र, सरकारने ती दखल घेतली नाही.
चार दिवसांची सुटी लागून आलेली होती. त्यामुळे सरकारने पहाटे, रात्री किंवा ऑनलाईन उद्घाटन करायला हवं होतं. अजितदादांची आज आठवण येण्याचं कारण म्हणजे त्यांनी लोकांना असा कधी त्रास दिलेला नाही. पुण्यात आम्ही ते पाहिलेलं आहे, असेही त्यांनी नमूद केले.
दुसऱ्या एका प्रवाशाने ‘टोटल मिस मॅनेजमेंट’ म्हणत याबाबत नाराजी व्यक्त केली. मुंबहून सूरतला निघालेला एक प्रवासी दीड तास वाहतूक कोंडीत अडकला होता. त्या प्रवाशाने, ‘अजितदादा असते तर सकाळी सहाला उद्घाटन झालं असतं,’ असं सांगून उद्घाटन सोहळ्याच्या चुकलेल्या टायमिंगवर बोट ठेवले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.