Mangalvedha Politics : ‘अहो ताई...किती करताय घाई’?: लोकसभेतील ‘मंगळवेढा उपसा’च्या प्रश्नावरून आवताडे समर्थकांचा प्रणिती शिंदेंना सवाल

Praniti Shinde Vs Samadhan Autade : प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत शून्य प्रहारात मंगळवेढा उपसा सिंचन पाणी योजनेस मंजुरी देण्याची मागणी केली होती. मात्र, आमदार आवताडे समर्थकांकडून त्यांची खिल्ली उडवली जात आहे. या योजनेला अगोदरच मंजुरी मिळाली आहे आता तुम्ही कोणत्या योजनेची मंजुरी मागत आहात, असा सवाल केला आहे.
Samadhan Autade-Praniti Shinde
Samadhan Autade-Praniti ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mangalvedha, 27 July : मंगळवेढा तालुक्याच्या पाणी प्रश्नावरून सुरू असलेले राजकारण काहीकेल्या थांबण्याचे नाव घेत नाही. कारण, सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी शून्य प्रहरात लोकसभेत ‘मंगळवेढा उपसा सिंचन योजने’ला मान्यता द्यावी, अशी मागणी लोकसभेत केली होती.

मात्र, त्यांच्या या मागणीची भाजप आमदार समाधान आवताडे समर्थकांकडून खिल्ली उडवली जात आहे. ‘अहो ताई...किती करता घाई’ असे म्हणत तुम्ही कोणत्या योजनेच्या मंजुरीची मागणी करत आहात, असा सवाल केला आहे.

लोकसभेच्या 2009 च्या निवडणुकीवेळी मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर विविध सरकारच्या काळात या योजनेस मंजुरी, योजनेचे सर्वेक्षण, पाणी उपलब्धता, वाल्मीक समितीचा अहवाल, विदर्भ अनुशेषाची अट, फेरसर्वेक्षण तांत्रिक मान्यता, डी पी आर, सुधारित प्रशासकीय अशा अनेक अटींची पूर्तता करण्यासाठी तब्बल 15 वर्षांचा कालावधी जावा लागला.

या योजनेसाठी तत्कालीन आमदार (स्व.) भारत भालके (Bharat Bhalke) यांनी पाठपुरावा केला होता. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील तत्कालीन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी या योजनेचे वर्णन गंडवागंडवीची योजना असे केले होते.

भालके यांच्या अकाली निधानानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ‘भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना आमदार करा. मी केंद्र सरकारकडून मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी निधी आणतो,’ असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. मात्र, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या शब्दानुसार अजूनही या योजनेसाठी भरीव निधी केंद्र सरकारकडून मिळालेला नाही, त्यामुळे अजूनही पाणीप्रश्न सुटू शकलेला नाही.

Samadhan Autade-Praniti Shinde
Assembly Election : राष्ट्रवादीने वाढविले काँग्रेसचे टेन्शन; धुळ्यातील साक्री, शिरपूर मतदारसंघावर ठोकला दावा

दरम्यान, आमदार समाधान आवताडे यांनी 15 मार्च 2023 मध्ये विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता. तर 14 मार्च 2024 रोजी या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, त्यानंतर या योजनेची प्रशासकीय निविदाही प्रसिद्ध झाली आहे, त्यामुळे आमदार आवताडे समर्थकांकडून लोकसभेत मान्यतेची मागणी करणाऱ्या प्रणिती शिंदे यांना टार्गेट केले जात आहे.

प्रणिती शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना निवडून आल्यास पहिला प्रश्न शेतकरी, पाणी प्रश्न आणि मराठा आरक्षणाचा असेल असे म्हटले होते, त्यानुसार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत शून्य प्रहारात मंगळवेढा उपसा सिंचन पाणी योजनेस मंजुरी देण्याची मागणी केली होती. मात्र, आमदार आवताडे समर्थकांकडून त्यांची खिल्ली उडवली जात आहे.

या योजनेला अगोदरच मंजुरी मिळाली आहे आता तुम्ही कोणत्या योजनेची मंजुरी मागत आहात, असा सवाल करून ‘अहो ताई किती करता घाई’ म्हणत प्रणिती शिंदे यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

Samadhan Autade-Praniti Shinde
Pandharpur Assembly : सुशीलकुमार शिंदेंच्या निकटवर्तीयाचे पंढरपूर विधानसभेसाठी नाव चर्चेत; भालकेंना महाआघाडी संधी देणार का?

खासदार प्रणिती शिंदे यांनी ‘मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला निधी मिळावा,’ अशी मागणी करायची गरज होती. त्या योजनेला केंद्र सरकारकडून निधी मिळतो का, याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी जी मागणी केली, त्या योजनेला अगोदरच मान्यता मिळाली आहे, त्यामुळे ‘अहो ताई.... किती करता घाई’. असे चुकीचे प्रश्न उपस्थित करून नेमकं काय साध्य करता, असा सवालही सोशल मीडियातून खासदार प्रणिती शिंदे यांना आवताडे समर्थकांकडून विचारला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com