Samarjeet Ghatge Meet Youngsters : समरजीत घाटगेंचं पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरूणांसोबत जॉगिंग; गप्पा-टप्पा अन् सेल्फी..

Kolhapur Politics : "कोण कोणत्या गावचा आहे? शिक्षण काय आहे?"
Samarjeet Ghatge
Samarjeet GhatgeSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : राजकीय नेत्यांबाबत तरूणाईमध्ये आकर्षण असते. नेहमीच लोकांच्या गराड्यात असलेल्या नेत्यांशी राजकारणाशिवाय ही इतरही विषयांवर निवांत चर्चा करण्याची संधी मिळणं दुर्मिळ असतं. मात्र कोल्हापूरमधील पोलीस भरती सराव करणाऱ्या तरूणांना मात्र जिल्ह्यातील मोठे राजकारणी, शाहू ग्रुपचे प्रमुख समरजीत घाटगे यांच्या सोबत जॉगिंग करायची संधी मिळाली. समरजीत यांच्या सोबत निवांत गप्पा मारून तरुणही खुश झाले.(Latest Marathi News)

Samarjeet Ghatge
Pune Medical College News: पुण्याच्या मेडिकल कॉलेजमधील ‘ती’ वसुली म्हणजे राजकीय नेत्यांचे रॅकेट ? नावे उघड होणार !

शाहू ग्रुपचे प्रमुख समरजीत घाटगे यांना सकाळी दररोज व्यायाम करतात. यासाठी ते शहरातील वेगवेगळ्या मैदानावर जात असतात. गुरुवारी ते मेरी वेदर मैदानावर व्यायामासाठी गेले होते. यावेळी पोलीस भरतीसाठी सराव करणारे काही तरुण त्यांना भेटले. या तरुणांनी समरजीत यांच्यासोबत सेल्फी काढले. त्यानंतर गप्पा रंगल्या. तरुण काय आणि कसे व्यायाम करतात याची माहिती त्यांनी घेतली.

Samarjeet Ghatge
Flying Kiss Controversy : राहुल गांधी 50 वर्षाच्या महिलेला 'फ्लाईंग किस' का देतील ? त्यांच्या मागे मुली कमी आहेत का? काँग्रेस आमदाराच्या वक्तव्याने वादात भर..

कोण कोणत्या गावचा आहे? शिक्षण काय आहे? अशा गप्पा झाल्यानंतर समरजीत यांनी त्यांच्या सोबत जॉगिंग केले. व्यायामही केला. यामुळे तरुणही खुश झाले. यातला संदीप पाटील हा तरुण सांगतो, "आम्ही आतापर्यंत वर्तमानपत्रातल्या बातम्यामधून समरजीतराजे यांना बघत होतो, आज प्रत्यक्ष भेटलो. आम्ही त्यांच्या मतदारसंघातील नसताना देखील आम्हाला वेळ दिला."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com