Samtrjeet Ghatge : समरजीत घाटगेंना लागले घरवापसीचे वेध; भाजप प्रवेशासाठी चंद्रकांतदादा काढणार मुहूर्त

Samtrjeet Ghatge : कागल विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे हे घरवापसी करणार असल्याची माहिती आहे.
Samarjeet Ghatge, Chandrakant Patil
Samarjeet Ghatge, Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

Samrjeet Ghatge Ready to join BJP : कागलमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांचा भाजपप्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील या आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. याच दौऱ्यात घाटगे यांच्या प्रवेशाचा मुहूर्त निघणार आहे.

गतवर्षी विधानसभा निवडणुकीत कागल विधानसभा मतदारसंघात महायुतीमधून हसन मुश्रीफ यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर समरजीत घाटगे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवली. मात्र पराभव झाल्यानंतर आता समरजीत घाटगे यांना पुन्हा भाजप प्रवेशाचे वेध लागले आहेत. पावसाळी अधिवेशनादरम्यान त्यांनी मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या.

घाटगे यांचं सहकारात मोठे नाव आहे. शाहू कारखाना, शाहू दूध, शिक्षण संस्था, बँकिंग क्षेत्रात देखील योगदान आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात राहून सहकारी संस्था सांभाळणे आव्हानात्मक ठरते. सरकार पूरक भूमिका घेणेच अधिक हिताचे असते, असा अनुभव त्यांना मागील काही दिवसात आल्याचे सांगितले जाते.

Samarjeet Ghatge, Chandrakant Patil
Kolhapur Politics : स्थानिकच्या निवडणुकांमध्ये कमळ अन् घड्याळासमोरील बटण दाबा, अजितदादांच्या शिलेदाराने शिवसेनेचं नावं घेणं टाळलं, चर्चांना उधाण

मुश्रीफ यांना विजयासाठी झुंजवले :

2024 च्या विधानसभा निवडणुकीत घाटगे यांचा पराभव झाला असला तरी त्यांना 1 लाख 33 हजार मते मिळाली. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त मते मिळवणारे विरोधी पक्षातील ते एकमेव उमेदवार आहेत. याशिवाय मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा त्यांना यंदा 45 हजार अधिकची मते मिळाली आहेत.

Samarjeet Ghatge, Chandrakant Patil
Kolhapur Corruption : काहींना गुगल पे, काहींना रोख रक्कम! कोल्हापुरातील ठेकेदाराने अधिकाऱ्यांचे 'रेट कार्ड' मुख्यमंत्र्यांना पाठवले

दुसऱ्या बाजूला मुश्रीफ यांना महायुती, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे, लाडकी बहीण योजनेची मदत मिळाली. असे असताना देखील मुश्रीफ यांना कमी मताधिक्य मिळाले. मागील निवडणुकीपेक्षा मंत्री मुश्रीफ हे केवळ 11 हजार मतांनी विजयी झालेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com