Samarjitsinh Ghatge : समरजितसिंह घाटगे शरद पवारांच्या उपस्थितीत 'तुतारी' हाती घेणार, वस्ताद मुश्रीफांचा 'गेम' करणार?

Samarjitsinh Ghatge Joins NCP Sharad Pawar :आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारीची अडचण निर्माण झाल्यानंतर भाजपला 'रामराम' ठोकत 'शाहू' ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे 'तुतारी' हाती घेणार आहेत.
Sharad Pawar-Hasan Mushrif - Samarjeet Shinh Ghatge
Sharad Pawar-Hasan Mushrif - Samarjeet Shinh Ghatge Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News: 'शाहू' ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( शरदचंद्र पवार ) प्रवेश करणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवारसाहेब कोल्हापुरात आले आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या गैबी चौकातील निवास्थानाच्या दारातच हा पक्षप्रवेश होत आहेत. त्यामुळे घाटगे गटाकडून वस्ताद येत आहेत, अशी जाहिरातबाजी करण्यात आली आहे.

संध्याकाळी सहा वाजता गैबी चौकात समरजितसिंह घाटगे ( Samarjitsinh Ghatge ) यांचा पक्षप्रवेश होणार आहे. दहा वर्षानंतर शद पवारसाहेबांची गैबी चौकात सभा होत असून पालकमंत्री मुश्रीफ यांच्या विरोधात पवारसाहेब काय बोलणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Sharad Pawar-Hasan Mushrif - Samarjeet Shinh Ghatge
Gokul Dudh Sangh : गोकुळचे अध्यक्ष महाडिकांच्या कार्यकर्त्यांवर चांगलेच भडकले; म्हणाले, दोन महिन्यांनी....

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारीची अडचण निर्माण झाल्यानंतर भाजपला 'रामराम' ठोकत 'शाहू' ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे 'तुतारी' हाती घेणार आहेत.

दहा वर्षांपासून घाटगे भाजपमधून ( Bjp ) राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय होते. मात्र, महायुतीतून कागल विधानसभा मतदारसंघात अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीकडून पालकमंत्री मुश्रीफ यांची उमेदवारी निश्चित मानली जाते.

त्याच पार्श्वभूमीवर घाटगे यांनी 'तुतारी' हाती घेण्याचं ठरवलं. याबद्दल नुकतेच मेळावा घेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत घोषणा केली होती. मात्र, समरजितसिंह घाटगे यांना पालकमंत्री मुश्रीफ यांच्याविरोधात उतरवून शरद पवारसाहेब चितपट करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Sharad Pawar-Hasan Mushrif - Samarjeet Shinh Ghatge
Satej patil : घाटगेंच्या 'MVA'तील एन्ट्रीनं मुश्रीफ अन् सतेज पाटलांच्या मैत्रीत फूट? 'या' कारणामुळे चर्चांना उधाण

दरम्यान, राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं निश्चित होताच समजितसिंह घाटगे यांनी कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांची भेट घेतली होती. विधानसभेला पाटील यांची साथ मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी भेटीत व्यक्त केली.

दरम्यान, पक्षप्रवेश सोहळ्यासाठी कागलमध्ये घाटगे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. 'वस्ताद येत आहेत,' '84 वर्षांच्या योद्ध्याला साथ देऊया,' अशी बॅनरबाजी चौका-चौकात केल्याचं दिसून येते.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com