Satej patil : घाटगेंच्या 'MVA'तील एन्ट्रीनं मुश्रीफ अन् सतेज पाटलांच्या मैत्रीत फूट? 'या' कारणामुळे चर्चांना उधाण

Satej Patil On K.p Patil : सतेज पाटील म्हणतात, "के.पी पाटील यांच्यासह अनेकजण महाविकास आघाडीसोबत येण्यास तयार आहेत, पण..."
hasan mushrif samarjit sinh ghatge satej patil.jpg
hasan mushrif samarjit sinh ghatge satej patil.jpgsarkarnama
Published on
Updated on

कोल्हापुरातील सहकार आणि राजकारणात पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस नेते, सतेज उर्फ बंटी पाटील यांची मैत्री सर्वश्रृत आहे. पण, राज्यातील बदलत्या समीकरणांमुळे यांच्या मैत्रीत विधानसभेच्या निमित्तानं दरार पडण्याची शक्यता आहे. कारण, कागल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे संभाव्य उमेदवार हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार समरजितसिंह घाटगे आहेत.

त्यामुळे पाटील ( Satej Patil ) यांना घाटगे यांचा प्रचार करावा लागणार आहे. मात्र, मुश्रीफ यांच्याशी असलेल्या मैत्रीवर पाटील यांनी थेट बोलणं टाळत घाटगे यांचं महाविकास आघाडीत स्वागत केले आहे.

सतेज पाटील ( Satej Patil ) म्हणाले, "महायुतीतील तीनही चाकांमधील नटबोल्ट नटबोल्ट आता निघायला सुरुवात झाली आहे. जनता त्यांचे नटबोल्ट काढणारच आहे. पण, हळूहळू एकेक नटबोल्ट विधानसभा निवडणुकीपर्यंत बाजूला झालेले दिसतील. ही अनैसर्गिक युती लोकांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील मान्य नाही. समरजितसिंह घाटगे यांच्यामुळे सुरुवात झाली आहे. आता महाराष्ट्रात अनेक विधानसभा मतदारसंघात हे चित्र दिसेल."

hasan mushrif samarjit sinh ghatge satej patil.jpg
Samajeetsinh Ghatge News: समरजित घाटगेंनी का निवडला शरद पवार गटाचा मार्ग? मुश्रीफांचा पराभव करणे त्यांना शक्य आहे?

"महाविकास आघाडी म्हणून समरजितसिंह घाटगे ( Samarjitsinh Ghatge ) यांचे स्वागत असेल. महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक आम्ही लढणार आहोत. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणे हेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहे," असं सतेज पाटील यांनी म्हटलं.

hasan mushrif samarjit sinh ghatge satej patil.jpg
Dhananjay Mahadik : "महाडिक आता कोंडी करून घेणार नाहीत," घाटगेंच्या प्रश्नावर खासदार महाडिक असं का म्हणाले?

राधानगरी मतदारसंघातील माजी आमदार के.पी. पाटील यांच्याबाबत भाष्य करताना सतेज पाटील म्हणाले, "के.पी पाटील यांच्यासह अनेकजण महाविकास आघाडीसोबत येण्यास तयार आहेत. सर्वांशी चर्चा करून आणि मतदारसंघ कोणाकडे जातात, यावरच निर्णय घेण्यात येईल."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com