Sambhaji Bhide News : मनमाडमध्ये भिडेंची गाडी अडवत काळे झेंडे दाखवले; भाजप आमदारानं फडणवीसांकडे केली 'ही' मागणी

Sambhaji Bhide Manmad News : 29 फेब्रुवारीला संभाजी भिडे मनमाड दौऱ्यावर होते. तेव्हा, संभाजी भिडेंची गाडी अडवून काळे झेंडे दाखवण्यात आले.
sambhaji bhide devendra fadnavis
sambhaji bhide devendra fadnavissarkarnama

नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे ( Sambhaji Bhide ) यांची गाडी अडवत त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. या घटनेचा आमदार सुधीर गाडगीळ ( Mla Sudhir Gadgil ) यांनी निषेध व्यक्त केला. संभाजी भिडेंना संपूर्ण महाराष्ट्र विशेष पोलिस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्याकडे गाडगीळांनी केली आहे.

sambhaji bhide devendra fadnavis
Ramdas Kadam News : रामदास कदमांनी सुनावले भाजपला खडेबोल; शिवसेना-भाजपमध्ये ठिणगी पडणार?

29 फेब्रुवारीला संभाजी भिडे ( Sambhaji Bhide ) मनमाड दौऱ्यावर होते. तेव्हा संभाजी भिडेंची गाडी अडवून काळे झेंडे दाखवण्यात आले. "अशा घटना रोखण्याची गरज सद्यःस्थितीत निर्माण झाली आहे. त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे आपल्यासह राज्य सरकारची आहे," असं सुधीर गाडगीळ यांनी म्हटलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गाडगीळ म्हणाले, "ज्यांच्याकडून इतिहास जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिंदू धर्म जागृतीसाठी फिरत आहेत, त्यांच्याबाबत असे प्रकार घडतात कसे? असा प्रश्न निर्माण होत आहे. संभाजी भिडेंवर यापूर्वीही वारंवार हल्ले झाले आहेत. अशा घटना रोखण्याची गरज सद्यःस्थितीत निर्माण झाली आहे. त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे आपल्यासह राज्य सरकारची आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही."

sambhaji bhide devendra fadnavis
Kopargaon Politics: विवेक कोल्हेंची तोफ मंत्री विखे, आमदार काळेंवर धडाडली

"संभाजी भिडेंच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही, याबाबतची दक्षता घेऊन महाराष्ट्र शासनाकडून संपूर्ण राज्यभर विशेष पोलिस सुरक्षा द्यावी. याबाबत तत्काळ कार्यवाही होईल," असा विश्वासही गाडगीळ यांनी व्यक्त केला.

R

sambhaji bhide devendra fadnavis
Devendra Fadnavis News : काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का; 'या' बड्या नेत्याला देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com