Congress Strategy: ठाकरे बंधूंना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसचा मोठा डाव; ऐनवेळी शिवसेनेच्या जुन्या मित्रपक्षाशीच हातमिळवणी

BMC Election 2026 News: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आता उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाली आहे. यामुळे मुंबईत भाजपसह सर्वच राजकीय पक्षांची झोप उडाली आहे. याचदरम्यान,आता काँग्रेसनं मोठा डाव टाकला आहे.
Uddhav and Raj Thackeray
Uddhav and Raj Thackeray’Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर कमकुवत झालेल्या उद्धव ठाकरेंनी 100 % राजकीय समझोता दाखवत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंशी जुळवून घेतलं. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आता उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाली आहे. यामुळे मुंबईत भाजपसह सर्वच राजकीय पक्षांची झोप उडाली आहे. याचदरम्यान,आता काँग्रेसनं (Congress) मोठा डाव टाकला आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी युतीचे संकेत दिल्यानंतर स्वबळाची घोषणा केलेल्या काँग्रेसनं मोठा प्लॅन रचला. काँग्रेसकडून आक्रमक चाल खेळण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीसोबतच्या युतीची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचितचे नेते धैर्यवर्धन पुंडकर यांनी सोमवारी(ता.29) पत्रकार परिषदेत मुंबई महापालिकेसाठी एकत्र आल्याचे जाहीर केलं.

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी घरोबा केला होता. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यात भिमशक्ती आणि शिवशक्तीचा नारा घुमला होता. पण उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांची महाविकास आघाडीतील एन्ट्री आणि जागावाटपावरुन फिस्कटलं होतं. अखेर ठाकरेंनीही फारसा प्रतिसाद न दिल्यामुळे अखेर वंचितनं आपल्या उमेदवारांची घोषणा केली होती. पण वंचितनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसला महापालिकेच्या निवडणुकीसाठी रासपचे महादेव जानकर यांच्यानंतर आता वंचितचाही पाठिंबा मिळाला आहे. या दोन्ही बड्या पक्षांच्या पाठिंब्यांनंतर मुंबईतील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. युतीची घोषणा करतानाच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचितचे नेते धैर्यवर्धन पुंडकर यांनी मुंबई महापालिकेसाठीचा दोन्ही पक्षांचा जागावाटपाचा फॉर्म्युलाही सांगितला आहे.

Uddhav and Raj Thackeray
Non-Marathi BJP Candidates Mumbai Election : भाजपच्या अमराठी उमेदवारांची यादी, मनसेनं टायमिंग साधलं! 'मुंबईचा महापौर मराठीच होणार', असं का सांगत नाही...

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने 227 पैकी 62 तर काँग्रेस 165 जागांवर जागा उमेदवार देणार आहे.या नव्या समीकरणांमुळे 2017 च्या महापालिका निवडणुकीतील काँग्रेसचा 16 टक्के असलेला मतांचा टक्का 20-25 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

काँग्रेस-वंचित बहुजन आघाडी,उद्धव ठाकरे शिवसेना- मनसे,राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप-शिवसेना अशा युत्यांमुळे निवडणुकांच्या लढतीत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Uddhav and Raj Thackeray
Supreme Court News : मोठ्या वादानंतर माजी CJI गवई यांच्या महत्वपूर्ण निकालाला स्थगिती; मोदी सरकारला नोटीस

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 वर्षांनंतर प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस पक्षाची युती झाली असून दोन्ही पक्ष संविधानाचं रक्षण करण्यासाठी एकत्र आल्याचंही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं.पण एकीकडे मुंबई महापालिका उद्धव ठाकरेंच्या हातून हिरावण्यासाठी भाजप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं ताकद लावली असताना आता स्वबळावर ठाम असताना ऐनवेळी काँग्रेसनं वंचितशी हातमिळवणी केली आहे.काँग्रेसला वंचित बहुजन आघाडी बीएमसीवर सत्ता मिळवण्यासाठी किती फायदेशीर ठरणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com