Sambhajiraje Chhatrapati.jpg
Sambhajiraje Chhatrapati.jpgSarkarnama

Sambhajiraje Chhatrapati News : शाहू महाराजांच्या 'त्या' पत्रावर संभाजीराजेंची स्पष्ट भूमिका,म्हणाले,'माझ्या स्वार्थासाठी...'

Sambhajiraje On Shahu Maharaj Letter : 'ज्या शिवभक्तांना जबाबदार धरून गुन्हा नोंद केला आहे. त्यापेक्षा मला जबाबदार धरा हेच सांगण्यासाठी येथे आलो होतो', असेही त्यांनी सांगितले.
Published on

Kolhapur News : विशाळगडच्या घटने प्रकरणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह 50 गडप्रेमींवर शाहुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती समजताच संभाजीराजे छत्रपती यांनी पोलीस ठाण्यात जाऊन सुमारे दीड तास ठिय्या मारला. यानंतर त्यांनी शाहू महाराजांच्या पत्रावरही थेट भाष्य केले आहे.

स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी सोमवारी (ता.15) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विशाळगडावरील अतिक्रमणांवरुन आक्रमक पवित्रा घेतला. ते म्हणाले, कालच्या घटनेवर गुन्हा नोंद झाल्याचे मला समजले. म्हणून मी शाहुवाडी पोलीस ठाण्यात हजर होण्यासाठीच आलो होतो. माझ्यावर गुन्हा नोंद झाल्याची माहिती मला मिळाल्यानंतर कायद्याचा सन्मान दाखवूनच मी शाहूवाडी पोलीस ठाण्यात हजर झालो होतो. ज्या शिवभक्तांना जबाबदार धरून गुन्हा नोंद केला आहे. त्यापेक्षा मला जबाबदार धरा हेच सांगण्यासाठी येथे आलो होतो असेही त्यांनी सांगितले.

माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे का? याचे उत्तर पोलिसांनी शेवटपर्यंत दिलं नाही. पालकमंत्र्यांच्या आदेशासाठी माझ्यावर गुन्हा नोंद करायचा थांबवला आहे का? पालकमंत्र्यांनी कदाचित गुन्हा नोंद करण्यासाठी थांबण्यास सांगितले असणार, असा आरोप माजी खासदार संभाजीराजेंनी केला.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि जिल्हाधिकारी यांच्या चर्चेनंतर किल्ले विशाळगडावरील बेकायदेशीर अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे. जे या प्रकरणाला जातीय रंग देत आहेत मी त्यांना सांगू इच्छितो की, विशाळगडावरील पहिलं अतिक्रमण प्रकाश पाटील या व्यक्तीचे निघाले आहे. गडावरील पहिले दोन अतिक्रमण ही हिंदू व्यक्तींची काढली आहेत. त्यामुळे माझा प्रयत्न हा प्रामाणिक होता की, गड-किल्ल्यांवरील अतिक्रमण निघावे,असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

Sambhajiraje Chhatrapati.jpg
Imtiaz Jaleel on Sambhaji Raje Chhatrapati : 'संभाजीराजे छत्रपती हे खरंच शाहू महाराजांचे वंशज आहेत का..? असा प्रश्न पडतो; इम्तियाज जलील यांचं मोठं विधान!

शाहू महाराज छत्रपती यांनी काढलेल्या पत्रकावर संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शाहू महाराज छत्रपती यांनी दोन भूमिका घेतल्या आहेत. खासदार म्हणून आणि वडील म्हणून त्यांच्या या भूमिका आहेत. स्वतः शाहू महाराज यांनी मला सांगितलं होतं की, जिल्हा प्रशासन आणि पोलीस यांच्याबरोबर बैठक घेऊ. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करण्याचे ठरले होते, मात्र ते झाले नाही असे विधानही त्यांनी यावेळी केले.

मुंबईतली बैठक झाली नाही म्हणून शाहू महाराज छत्रपती यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. माज्याबद्दल जी भूमिका त्यांनी व्यक्त केली ती मी स्वीकारतो. पण माझी भूमिका काय होती हे त्यांनी खासदार म्हणून जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रशासनाला विचारावे. मी आक्रमक होतो याचं मला काही वाईट वाटत नाही, मी माझ्या स्वार्थासाठी आक्रमक नव्हतो विशाळगडासाठी आक्रमक होतो. कारण या विशाळगडाने छत्रपती शिवरायांचे संरक्षण आणि रक्षण केले होते. अशा शब्दात संभाजी राजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान. संभाजीराजे छत्रपती यांचा मुस्लिम समाजाकडून निषेध व्यक्त होत आहे. त्यावर उत्तर देताना संभाजी राजे छत्रपती यांनी, माझ्या पुरोगामीवर शंका घेणारे घेऊ देत. ज्यावेळी अतिरेकी त्या ठिकाणी राहिला त्यावेळी यांचे पुरोगामी कुठे होते. यासिन भटकळवर तुम्ही का चर्चा केली नाही,असा पलटवार हे निषेधकर्त्यांवर केला आहे.

Sambhajiraje Chhatrapati.jpg
Ashish Shelar : शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद-उद्धव ठाकरेंच्या भेटीवर भाजपच्या मोठ्या नेत्याची प्रतिक्रिया, म्हणाले, 'हिंदुत्व सोडलं...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com