BJP Controversy: ईश्वरपूर भाजपमध्ये जुना- नवा वाद उफाळला, सम्राट महाडिकांनी मुलाखती घेताच विक्रम पाटलांनी घरीच केला 'कार्यक्रम'

Ishwarpur BJP Politics: नगरपालिकांची निवडणूक तोंडावर आली असताना ईश्वरपूर नगरपालिकेमध्ये भाजपमधील जुना नवा वाद उफाळला आहे. नगराध्यक्षपदासह इच्छुकांच्या मुलाखती घेत असताना नव्या आणि जुन्या पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे मुलाखत घेतल्याने इच्छुकांमध्ये खळबळ उडाली आहे.
bjp Ishwarpur politics .jpg
bjp Ishwarpur politics .jpgSarkarnama
Published on
Updated on

शांताराम पाटील

Sangli News: नगरपालिकांची निवडणूक तोंडावर आली असताना ईश्वरपूर नगरपालिकेमध्ये भाजपमधील जुना नवा वाद उफाळला आहे. नगराध्यक्षपदासह इच्छुकांच्या मुलाखती घेत असताना नव्या आणि जुन्या पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे मुलाखत घेतल्याने इच्छुकांमध्ये खळबळ उडाली आहे.

भाजपचे (BJP) जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह आमदार सुरेश खाडे, आमदार सदाभाऊ खोत यांनी इच्छुकांची मुलाखत येण्याचा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर भाजपचे जुने पदाधिकारी विक्रम पाटलांनी ही इच्छुकांच्या मुलाखती घेत थेट लिस्टच तयार केले. त्यामुळे काही काळ इच्छुकही चांगलेच गोंधळून गेले होते.

उरण ईश्वरपूर नगरपालिकेसाठी भाजपच्या वतीने आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र, शुक्रवारी (ता.7) मुलाखती दरम्यान भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून आल्याचे दिसले. आमदार सुरेश खाडे (Suresh Khade), सदाभाऊ खोत, पृथ्वीराज देशमुख ,भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, ॲड.चिमण डांगे यांच्या उपस्थितीत सावकार कॉलनीत मुलाखती झाल्या.

तर दुसरीकडे भाजपाचे विक्रम पाटील यांनी शिवाजी चौकातील त्यांच्या घरी भाजपाच्या इच्छुक उमेदवारांना बोलावून घेत मुलाखतीच्या ठिकाणी न जाता 57 उमेदवारी अर्ज एका कार्यकर्त्याकरवी पाठवून दिले.

bjp Ishwarpur politics .jpg
Pune Land Scam : पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी अपडेट, तिघांवर गुन्हा दाखल; निलंबित अधिकाऱ्याच्या अडचणी वाढल्या

एकाच पक्षाच्या दोन ठिकाणी मुलाखती झाल्याचे चित्र तयार झाले. इच्छुकांची कुठे मुलाखत द्यायची याबाबत संभ्रम झाला. आज मुलाखती दरम्यान, जुने नवे संघर्ष उफाळून आल्याचे दिसले. इस्लामपूर नगरपालिकेत जयंत पाटील यांना घेरण्यासाठी राज्य पातळीवरून तयारी सुरू झाली आहे.

सक्षम उमेदवार देऊन निवडणूक जोरदारपणे लढवण्याची महायुतीची तयारी आहे. याच अनुषंगाने आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत निरीक्षक म्हणून आमदार सुरेश खाडे, सदाभाऊ खोत,पृथ्वीराज देशमुख या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावत इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.

bjp Ishwarpur politics .jpg
Ajit Pawar News: अजित पवार CM फडणवीसांच्या भेटीनंतर पार्थ पवार सर्वात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; वादग्रस्त जमीन...

निवडणूक जागा वाटपात भाजपामध्ये जुना नवा संघर्ष सुरू असल्याचे दिसत आहे. प्रत्येकजण आपल्या समर्थकाला संधी कशी मिळेल हे पाहत आहे. यातूनच भाजपाचे ईश्वरपूरमधील नेते विक्रम पाटील यांनी पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या मुलाखतीकडे पाठ फिरवत त्यांच्या निवासस्थानी इच्छुक समर्थकांना बोलावून घेतले.

पक्षाकडून वरिष्ठ नेते उपस्थित असूनही त्या ठिकाणी न फिरकता आपल्या समर्थकाची मुलाखती फॉर्म त्या ठिकाणी पाठवून दिले . काही नवीन लोक सामील झाल्यामुळे बरीच वर्षे पक्ष जिवंत ठेवण्याचे काम केलेल्या जुन्या लोकांना संधी मिळणार नाही अशी काही कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यातूनच आज गटबाजी झाल्याचे दिसले. या घडामोडीवरून भाजपामध्ये ईश्वरपूर शहरात सुरू असलेली अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com