Ajit Pawar News: अजित पवार CM फडणवीसांच्या भेटीनंतर पार्थ पवार सर्वात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; वादग्रस्त जमीन...

Ajit Pawar and CM Devendra Fadnavis Meeting: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात गंभीर आरोप केले जात आहे. यामुळे विरोधकांनी आपली सगळी ताकद लावत हे प्रकरण उचलून धरलं आहे. सत्ताधारी महायुतीवर आरोपांच्या फैरीवर फैरी झाडल्या जात आहे.
Devendra Fadnavis Ajit Pawar Parth Pawar .jpg
Devendra Fadnavis Ajit Pawar Parth Pawar .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात गंभीर आरोप केले जात आहे. यामुळे विरोधकांनी आपली सगळी ताकद लावत हे प्रकरण उचलून धरलं आहे. सत्ताधारी महायुतीवर आरोपांच्या फैरीवर फैरी झाडल्या जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेशही दिले होते. पण आता याप्रकरणी राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे शुक्रवारी (ता.7) तातडीनं वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेलही आहे. राष्ट्रवादीच्या या दोन्ही वरिष्ठ नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत पार्थ पवार जमीन घोटाळा आरोपांवरही चर्चा झाली आहे. या भेटीनंतर पार्थ पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं मोठी अपडेट समोर येत आहे.

पार्थ पवार हे जमीन या व्यवहारप्रकरणाला तूर्तास स्थगिती देण्याची शक्यता आहे.पार्छ पवार हे वादग्रस्त जमीन पुन्हा सरकारकडे जमा करण्याची शक्यता आहे. अशी माहिती समोर येत आहे.उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी हा घोटाळा पुण्यातला असून 1800 कोटींची जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीने अवघ्या 300 कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप केला आहे. तसेच या व्यवहारांला फक्त 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरली असल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे.

एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पार्थ पवार यांच्याबाबत जमीन घोटाळ्याप्रकरणी योग्य ती चौकशीचे आदेश दिले आहेत. आता यानंतर याप्रकरणी आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्र्‍यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. त्यामुळे या बैठकीत नेमका काय चर्चा होती. काही मोठा निर्णय होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

Devendra Fadnavis Ajit Pawar Parth Pawar .jpg
Rahul Gandhi: पुण्यातील जमीन व्यवहारावरून राहुल गांधीही आक्रमक; थेट PM मोदींशी जोडले कनेक्शन

'मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा...'

आता याप्रकरणी माजी मंत्री आणि विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनीही पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमीन प्रकरणाची चौकशी होईपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मोठी मागणी केली आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्या प्रकरणात एकनाथ खडसे यांना राजीनामा महसूल मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, असा संदर्भही दिला.

एकनाथ खडसे म्हणाले की, महसूल मंत्री असताना माझ्या कुटुंबावर बरेच आरोप झाले होते. पण त्या जमीन खरेदी प्रकरणाशी माझा थेट संबंध नव्हता. तरीही मी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाचे नाव जमीन खरेदी प्रकरणात समोर आल्यानंतर माझ्यावर त्यावेळी आरोप करणारे आता शांत बसले आहेत, असे म्हणत खडसे यांनी गिरीश महाजन आणि भाजपा नेत्यावर निशाणा साधला.

Devendra Fadnavis Ajit Pawar Parth Pawar .jpg
Thackeray brothers meeting : ठाकरे बंधू दीड महिन्यात तिसऱ्यांदा भेटले! नव्या राजकीय समीकरणांचा श्रीगणेशा की मोठा राजकीय स्फोट?

अजित पवारांची प्रतिक्रिया...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवार प्रकरणावर भाष्य केलं होतं. त्यांनी "तीन ते चार महिन्यांपूर्वी अशा पद्धतीचं काहीतरी सुरु असल्याचं माझ्या कानावर आलं होतं. तेव्हा मी असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही असं सांगितलं होतं असं म्हटलं होतं. तसेच कोणत्याही चुकीच्या गोष्टी कोणीही करु नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिल्याचंही पवार यांनी सांगितलं.

त्यानंतर परत काय झालं मला माहिती नाही. आता वेगवेगळ्या जमिनीबद्दल बरंच काही सांगितलं जातं. त्याची इत्यंभूत माहिती घेणार आहे की कोणती कागदपत्रं आहेत, कोणती नाही, कोणी परवानगी दिली, कोणी नाही," असंही अजित पवारांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com