Jayshree Patil : प्रवेशाआधीच माशी शिंकली! जयश्रीताईंविरोधात भाजपची 'दुसरी' फळी अस्वस्थ?; प्रवेश रखडल्याची चर्चा

BJP Politics Sangli : सांगलीत भाजपने मित्र पक्ष असणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या हातातील घास काढून घेतल्याचे चित्र सध्या येथे पाहायला मिळत आहे.
Jayshree Patil join BJP
Jayshree Patil join BJP sarkarnama
Published on
Updated on

Sangli News : सांगलीत आगामी स्थानिकच्या तोंडावर मोठ्या राजकीय घडामोडी पाहायाला मिळत आहेत. भाजपसह अजित पवार यांची राष्ट्रवादी सध्या आपल्या पक्षाचा खुट्टा येथे मजबूत करण्यात आगली असून मात्तबर मान्यवरांच्या प्रवेशासाठी प्रयत्न करत आहे. पण याच प्रयत्नात दोन्ही एकमेकांवर कुरघोडीही करताना दिसत आहे. भाजपने अशीच कुरघोडी येथे राष्ट्रवादीवर केली आहे. काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा मदन पाटील गटाच्या नेत्या जयश्रीताई पाटील राष्ट्रवादीत जाणार म्हटल्यावर पलटी डाव टाकत त्यांना आपल्या बाजुला खेचलं आहे. यामुळे सध्या येथे राष्ट्रवादीत नाराजी असल्याची चर्चा आहे. पण यापेक्षाही मोठी चर्चा भाजपमधूनच जयश्री पाटील यांच्या प्रवेशाला विरोध असल्याची आहे. तर त्यांना विरोध करणारा फोन मुंबईत गेल्याचेही आता समोर येत आहे.

जयश्रीताई पाटील यांच्या यावरून सांगलीत जोरदार रस्सी खेच पहायला मिळत असून राष्ट्रवादीच्या (अजित पवार) वाटेवर असणाऱ्या जयश्री पाटलांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये आणले आहे. त्यांचा आज (बुधवार ता. 18) दुपारी 3 वाजता मुंबईत प्रवेश होणार आहे. पण याआधीच सांगलीत भाजपमध्ये नाराजी समोर आली आहे.

भाजपमधील जून्या म्हणजेच मूळ भाजप आणि दुसऱ्या फळीतील म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या आधी तर विधानसभेच्या तोंडावर ज्यांनी प्रवेश केला त्यांची अडचण झाली आहे. यामुळेच येथे जयश्री पाटलांच्या प्रवेशामुळे नाराजी दिसत आहे. या नाराजांनी थेट मुंबईला फोन करून भाजपच्या वरिष्ठांपर्यंत ही नाराजी मांडली आहे. तसेच दुपारी होणारा पक्ष प्रवेश थांबवावा अशी मागणी केली आहे.

Jayshree Patil join BJP
Jayshree Patil : जयश्री पाटलांना भाजपचे रिटर्न गिफ्ट! प्रवेशाच्या आधीच चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा

या मागणीमुळे सांगलीत सध्या जयश्री पाटील यांचा भाजपमध्ये होणारा रखडलेला पक्ष प्रवेश रखडल्याची चर्चा रंगली आहे. पण जयश्री पाटील यांचा आज दुपारी तीन वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश निश्चित होणार आहे. त्यांच्याबरोबर तीन माजी महापौर यांच्यासह सुमारे 200 कार्यकर्ते यावेळी भाजपमध्ये प्रवेश करतील. हा प्रवेश नरिमन पॉईंट येथील भाजप कार्यालयात होणार आहे.

Jayshree Patil join BJP
Jayshree Patil : काँग्रेसकडून निलंबनाच्या कारवाईनंतर जयश्रीताई पाटील म्हणाल्या, ‘वसंतदादा घराण्यावर अन्याय...’

दरम्यान जयश्री पाटील यांच्या भाजपमध्ये

चंद्राकांत पाटील यांनी जयश्री पाटलांच्या भाजप प्रवेशाआधीच त्यांची वर्णी जिल्हा नियोजन समितीवर केल्याची घोषणा केलीय. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या गटाला आगामी स्थानिकच्या आधीच महापालिका क्षेत्रात निधी ओढून पदाधिकाऱ्यांना बळ देण्यास वाव मिळाला आहे. तर याच कारणामुळे देखील भाजपच्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com