Sangli District Bank Election : सांगली जिल्हा बँकेत दिग्गजांचे अर्ज मागे, 21 पैकी 17 जागा बिनविरोध? पडळकर, घोरपडेंच्या गटात होणार निवडणूक

Gopichand Padalkar And Ajitrao Ghorpade Sangli District Bank Election : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवडणूक लागली असून मतदानाच्या आधीच अर्ज माघार घेण्याच्या दिवशी २१ पैकी १९ जागा बिनविरोध झाल्या आहेत.
Sangli District Bank Election; Gopichand Padalkar
Sangli District Bank Election; Gopichand Padalkarsarkarnama
Published on: 
Updated on: 

Sangli district bank election latest news : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय तडजोडींचे गणित जुळल्याने २१ पैकी १७ जागा बिनविरोध होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र जत, कवठेमहांकाळ, तासगाव आणि मिरज सोसायटी गटांत मात्र निवडणुकीचा सामना रंगणार आहे. या निवडणुकीतील जागावाटपासाठी आज सकाळपासून जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर प्रमुख नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू होते. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये झालेल्या तडजोडीमुळे बहुतांश जागांवरील संघर्ष टळल्याचे चित्र आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी आज दिवसभर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर खलबते सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, ऋतुराज देशमुख, पृथ्वीराज पाटील, राहुल महाडिक, विश्वजीत कदम, सम्राट महाडिक, इंद्रिस नायकवडी, महेंद्र लाड आणि अमोल बाबर यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित होते. विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेतून जागावाटपाचे सूत्र निश्चित करण्यात आले.

जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपला चार, राष्ट्रवादी काँग्रेसला सात, काँग्रेसला सहा, अजित पवार गटाला एक आणि शिवसेना शिंदे गटाला तीन जागा देण्याचे सूत्र ठरले. या तडजोडीतून १७ जागांवरील निवडणुकीचा पेच सुटला असून, जत आणि कवठेमहांकाळ या दोन सोसायटी गटांत थेट लढती होणार आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जागावाटपाच्या तडजोडीने १७ जागांवरील संघर्ष टळल्याचे चित्र असले, तरी जत आणि कवठेमहांकाळमधील लढतींमुळे निवडणुकीतील राजकीय उत्सुकता कायम आहे.

Sangli District Bank Election; Gopichand Padalkar
District Bank Election : सांगली जिल्हा बँक निवडणुकीत ट्विस्ट! शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीच्या आमदाराची माघार, सुमन पाटलांची रणनीती

जागावाटपासाठी दिवसभर खलबते

जिल्हा बँकेवरील वर्चस्वासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता होती. मात्र, प्रमुख नेत्यांनी एकत्र बसून जागावाटपाचा तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर झालेल्या चर्चेत विविध पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या चर्चेमुळे अनेक जागांवरील संभाव्य संघर्ष टाळण्यात यश आल्याचे चित्र आहे.

पक्षनिहाय जागावाटप असे

पक्ष आणि जागा

भाजप ४

राष्ट्रवादी काँग्रेस ७

काँग्रेस ६

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) १

शिवसेना (शिंदे गट) ३

एकूण २१

बिनविरोध निवड झालेले १९ उमेदवार

१. अमोल बाबर

२. विश्वजीत कदम

३. महेंद्र लाड

४. देवराज पाटील

५. विराज नाईक

६. तानाजी पाटील

७. राहुल महाडिक

८. पृथ्वीराज पाटील

९. सतीश देशमुख

१०. रणधीर नाईक

११. के. डी. कांबळे

१२. वैभव विलासराव शिंदे

१३. पूजा विशाल पाटील

१४. वर्षा विक्रम सावंत

१५. रेणुका सत्यजित देशमुख

१६. संभाजी कचरे

१७. नितीन होणराव

कवठेमहांकाळमध्ये घोरपडे-पाटील लढत

कवठेमहांकाळ सोसायटी गटात माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि टी. व्ही. पाटील यांच्यात लढत होणार आहे. जागावाटपाच्या तडजोडीतून बहुतांश जागांवरील निवडणूक टळली असली, तरी या गटातील लढतीमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय चुरस कायम राहणार आहे.

जतमध्ये पडळकर-विनोद पवार आमनेसामने

जत सोसायटी गटात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि विनोद पवार यांच्यात सामना होणार आहे. दरम्यान तासगाव सोसायटी गटात देखील निवडणूक लागण्याची शक्यता असून माजी खासदार संजय पाटील विरुद्ध माजी आमदार सुमन पाटील असा थेट सामना होईल.

Sangli District Bank Election; Gopichand Padalkar
Latur DCC Bank Election : संभाजी निलंगेकरांनी मला मंत्री केलेले नाही, राजीनामा मागणारे ते कोण? सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी मौन सोडले!

तर मिरज सोसायटी गटात अण्णासाहेब कोरे यांच्या विरोधात आणि अनिल शेगुणसे यांनी उमेदवारी अर्ज ठेवला आहे. यामुळे एकूण बिनविरोध जागा १७ होण्याची शक्यता असून ४ ठिकणी लढत होईल. या लढतीकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बहुतांश जागा बिनविरोध होण्याच्या पार्श्वभूमीवर या दोन गटांतील निकाल महत्त्वाचे ठरणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com