Girish Mahajan, Dada Bhuse
Girish Mahajan, Dada BhuseSarkarnama

Nashik Politics : मोदींचा दौरा होताच नाशिकमध्ये महायुतीत रंगली वर्चस्वाची लढाई

Bjp Shiv Sena Tussle For Control Over Nashik : पंतप्रधान मोदींचा दौरा होताच नाशिकमध्ये महायुतीत राजकीय चढाओढ रंगली आहे...
Published on

Nashik Mahayuti Politics :

राष्ट्रीय युवा अभियान कार्यक्रमासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा यशस्वी करण्यात नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी खांद्याला खांदा लावून काम केले.

संयुक्तपणे हे चांगले चित्र असले तरी पक्षीय पातळीवर पालकमंत्री भुसे आणि मंत्री महाजन यांच्यातच खरी रस्सीखेच आहे. युतीत असताना आक्रमकपणे पक्षवाढ करण्याचे भाजपचे धोरण दादा भुसे कसे परतावून लावतात? असा प्रश्न सध्या नाशिकमध्ये चर्चेला आला आहे.

Lok Sabha Election 2024 च्या तोंडावर आयोजिण्यात आलेल्या पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने महायुतीत उभारीचे वारे भरले. कार्यक्रमाच्या सफलतेसाठी एकनाथ शिंदेंचे प्रमुख शिलेदार दादा भुसे आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला. दिवस-रात्र काम केले. अर्थात, या कार्यक्रमांचा राजकीय फायदा होईल की नाही, हे लोकसभेच्या निकालातून स्पष्ट होईल.

Girish Mahajan, Dada Bhuse
Chhagan Bhujbal News : जिल्हा बँकेला हवेत भुजबळांकडील 51 कोटी; काय आहे प्रकरण?

दुसरीकडे या कार्यक्रमाच्या आयोजनापासून राष्ट्रवादी (अजित पवार गट) दूर का राहिला हे कोडेच आहे. नाशिकमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दादा भुसेंना पुढे करीत पालकमंत्रिपद दिले. यामुळे नाशिकवर एकछत्री अंमल असलेल्या मंत्री छगन भुजबळ यांना धक्का बसला.

पक्षाला वर्चस्व मिळवून देताना दादा भुसे यांच्याकडून निधीवाटपात अन्याय होत असल्याची तक्रार राष्ट्रवादीसह भाजप आमदारांकडून होऊ लागली आहे. दुसरीकडे युती कोणाशीही असू दे पक्षवाढ थांबता कामा नये, असा भाजपचा अजेंडा राबवण्याची जबाबदारी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. अगदीच शिवसेना म्हणून ज्या विधानसभा मतदारसंघावर एकनाथ शिंदे गटाचा दावा असू शकतो, त्या ठिकाणीच इच्छुक उमेदवारांना पक्षात स्थान देण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली. वास्तविक पालकमंत्री या नात्याने दादा भुसे कोठे कमी पडले नसते. मात्र, तरीही नाशिकचा अप्रत्यक्ष कंट्रोल भाजपचा हे दाखवून देण्याचे काम यानिमित्ताने करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

दोघांचे मनोमिलन, तिसऱ्याचे काय?

सेना आणि भाजपाच्या अप्रत्यक्ष वर्चस्व वादात अजित पवारांची राष्ट्रवादी मात्र निपचित असल्याचे दिसते. राष्ट्रीय युवा अभियान कार्यक्रमाच्या आयोजनात भुसे आणि महाजन यांच्या जोडीने अथक परिश्रम घेतले. त्यांच्या मनोमिलनाने कार्यक्रम यशस्वीदेखील झाला. मात्र, मंत्री छगन भुजबळ वा अजित पवार गटाचे आमदार कार्यक्रमापासून चार हात लांब राहिले. त्यामुळे दोघांचे (सेना भाजपा) मनोमिलन झाले. तिसऱ्याचे (अजित पवार गट) काय? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

edited by sachin fulpagare

R...

Girish Mahajan, Dada Bhuse
Raver Loksabha : रक्षा खडसेंना उमेदवारी नाकारण्याचे धाडस भाजप दाखवेल का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com