Vishwajeet Kadam, Uddhav Thackeray
Vishwajeet Kadam, Uddhav ThackeraySarkarnama

Vishwajeet Kadam News : विश्वजित कदमांचा चंद्रहार पाटलांचे नाव न घेता पाठिंबा, काँग्रेस नेत्यांनाही सुनावले

Congress : सांगलीत जे झालं ते पुन्हा होऊ देऊ नका, असेदेखील आवाहन विश्वजित कदम यांनी नेत्यांना केले. त्यामुळे विश्वजित कदम हे महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत असणार हे स्पष्ट झाले आहे.
Published on

Loksabha Election : सांगली लोकसभेच्या जागेवर ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील लढत आहेत. काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (गुरुवारी) काँग्रेसचा मेळावा सांगलीत झाली. या मेळाव्यात आमदार विश्वजित कदम काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्या समोर विश्वजित कदम Vishwajeet Kadam यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना मनातील नाराजी बोलून दाखवली.

Vishwajeet Kadam, Uddhav Thackeray
Sharad Pawar NCP Manifesto: पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का? पवार गटाचा 'शपथनामा' प्रसिद्ध होताच भाजपची टीका

चंद्रहार पाटील chandrahar patil यांचे नाव न घेता विश्वजित कदम म्हणाले, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जी मतं मिळतील ती काँग्रेसची असतील. मात्र, त्यानंतर त्यांनी विधानसभा बाकीच्या गोष्टींची मागणी करू नये. ही मतं केवळ काँग्रेसची Congress आहेत. सांगलीत जे झालं ते पुन्हा होऊ देऊ नका, असेदेखील आवाहन विश्वजित कदम यांनी नेत्यांना केले. त्यामुळे विश्वजित कदम हे महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत असणार हे स्पष्ट झाले आहे.

विशाल पाटलांना राज्यसभेची ऑफर

विश्वजित कदम यांनी सांगितले की, विशाल पाटील यांना शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी मिळून राज्यसभेचा शब्द दिला होता. मी त्यांना म्हटले. भावा अपक्ष लढू नको. राज्यसभा भेटेल. पुढील वेळी लोकसभा नक्की भेटेल. जिल्ह्यातील काँग्रेसचा पंजा टिकवण्याची जबाबदारी माझी आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जागा देणे हे चुकीचेच...

सांगलीची जागा देणे हे चुकीचेच होते, यावर आपण आजही ठाम असल्याचे विश्वजित कदम म्हणाले. जागेसाठी काँग्रेस नेते प्रयत्न करत होते. मात्र, जागा गेली त्यामुळे कोण काय करतंय, यावर बारीक लक्ष का नव्हतं, असा सवालदेखील विश्वजित कदम यांनी काँग्रेस नेत्यांना विचारला. दरम्यान, सभा सुरू असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यावेळी स्टेजवरून खाली उतरून कार्यकर्त्यांची समजूत घातली.

R

Vishwajeet Kadam, Uddhav Thackeray
Congress Crisis News : गेहलोतांनीच दिले पायलट यांच्या फोन टॅपिंगचे आदेश; माजी ओएसडीचा बॉम्ब

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com