
Satara News : राज्याचे माजी सहकार मंत्री स्व. विलासराव पाटील-उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील-उंडाळकर काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. ते लवकरच काँग्रेसला रामराम करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. तर याबाबत आता जिल्ह्यासह राज्यात चर्चेंना उत आला असून उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याचे आता समोर आले आहे. मुंबईतील सह्याद्री गेस्ट हाऊसवर त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली असून त्यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील उपस्थित होते.
स्व. विलासराव पाटील उंडाळकर यांनी सातारा जिल्ह्याचे नेतृत्व केले असून एक काळ असा होता की ‘काका बोले जिल्हा हाले’अशी म्हण सातारा जिल्ह्यात रूढ झाली होती. साताऱ्यात काँग्रेसला बळ देण्याचे काम उंडाळकरांनी केले होते. तर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकही त्यांच्या ताब्यात होती. मात्र हे वैभव त्यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना राखता आलेलं नाही.
त्यांनी राजकारणात आपले पाऊल रोवण्याचे प्रयत्न करत असताना गावोगावी जनसंपर्क वाढवला. पण त्यांच्या हातून सगळं निसटताना दिसत आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. राज्यातही महाविकास आघाडीचा पराभव झाल्याने उदयसिंह पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
दोन दिवसांपूर्वीच मुंबईत सह्याद्री गेस्ट हाऊसवर राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार आणि उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्यात चर्चा झाली. यावेळी मंत्री मकरंदआबा पाटील यांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावे यासाठी चर्चा केली.
तसेच जी काँग्रेस यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेवर चालते त्याच विचारधारेवर अजित पवार गटही चालत असल्याने अडचण येणार नाही, असे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे. तर आपल्या योग्य सन्मान राखला जाईल, तातडीने निर्णय घ्या, असे अजित पवार यांनी उंडाळकरांना सांगितल्याचीही चर्चा आहे. यावर आपण कराड सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे उंडाळकरांनी बैठकीत सांगितले आहे.
दरम्यान उंडाळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास त्याचा थेट सातारा जिल्ह्यातील राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे कराड दक्षिणेतील वातावरण ढवळून निघाले असून याचा थेट फटका काँग्रेससह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बसण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीचा हा काँग्रेसला धक्का मानला जातोय.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.