BJP vs Congress : महापालिकेची प्रभाग रचना जाहीर, सांगलीत विश्वजीत-विशाल करणार भरगच्च झालेल्या भाजपची कोंडी?

BJP vs Congress political battle : आगामी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाली आहे. काही प्रभागांतील किरकोळ बदल वगळता महापालिकेचे प्रभाग ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहेत.
chandrakant patil, vishwajeet kadam, Vishal patil, Jayant Patil And Sangli political battle
chandrakant patil, vishwajeet kadam, Vishal patil, Jayant Patil And Sangli political battlesarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेची प्रभागरचना कायम ठेवण्यात आली आहे.

  2. 2018 प्रमाणेच यादी असून कोणताही बदल झालेला नाही.

  3. भाजपमधील पक्ष प्रवेशामुळे डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

  4. काँग्रेसने साम, दाम, दंड वापरून लढण्याचा निर्धार केला आहे.

  5. आगामी निवडणुकीत भाजप- काँग्रेस यांच्यात मोठी चुरस अपेक्षित आहे.

Sangli News : आगामी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकांसाठी आज महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रभागरचनेची प्रारूप यादी जाहीर झाली. काही प्रभागांतील किरकोळ बदल वगळता 2018 च्या निवडणुकीचीच प्रभाग रचना 2025 च्या निवडणुकीसाठी निश्चित करण्यात आली आहे. गेल्या निवडणुकीत ही प्रभाग रचना भाजपसाठी फायदेशीर ठरली होती. त्यामुळे यंदाही याचा फायदा भाजपला होईल अशी चर्चा सुरू आहे. मात्र झालेल्या इच्छुकांच्या पक्ष प्रवेशावेमुळे येथे भाजपमची डोकेदुखी वाढण्याची शक्यता असून अजित पवार यांची राष्ट्रवादी वेगळ्या विचारात दिसत आहे. तर विरोधी काँग्रेसने साम, दाम, दंड वापरून लढण्याचा निर्धार केला आहे. यामुळे या निवडणुकीत मोठी चुसर पाहायला मिळणार आहे.

आगामी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकांसाठी जाहीर करण्यात आलेली प्रभाग रचना महापालिकेच्या मुख्यालयासह तीनही विभागीय कार्यालयांमध्ये लावण्यात आली आहे. यामुळे ही प्रारूप यादी पाहण्यासाठी नागरिकांनी धाव घेतली होती. 2018 च्या निवडणुकीचीच प्रभाग रचनेत कोणताच बदल करण्यात आलेला नाही. ती यंदाही 99 टक्के कायम ठेवण्यात आली आहे. यावर 15 सप्टेंबरपर्यंत हरकती-सूचना देण्यासाठी मुदत आहे.

chandrakant patil, vishwajeet kadam, Vishal patil, Jayant Patil And Sangli political battle
Sangli Politics : जयश्री पाटील अन् पृथ्वीराज पाटलांच्या गटाचे पटणार नाहीच..? सांगलीच्या राजकीय संघर्षाचे मुंबईत दर्शन

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका 78 सदस्यांची असून वीस प्रभागांची आहे. जाहीर झालेल्या प्रभाग रचनेत कोणतेच बदल झालेले नाहीत. पण सांगलीवाडी (प्रभाग क्रमांक 13), मिरजेतील उत्तमनगर (प्रभाग क्रमांक 20) या दोन प्रभागात बदल झाला असून तो सदस्य संख्येवर आहे. येथे तीन सदस्य संख्या असणार आहे. उर्वरित सर्व अठरा प्रभाग चार सदस्यीय असतील. मिरजेतील दोन आणि तीन प्रभाग वगळता सर्व प्रभाग पूर्वीप्रमाणेच कायम आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे या रचनेसाठी 2011 च्या जनगणनेचा आधार असून, त्या लोकसंख्येच्या आधारे प्रभाग रचना असली तरी 1 जुलै 2025 ची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे.

भाजपची कोंडी?

आगामी स्थानिकच्या तोंडावर भाजपमध्ये अनेक मोठे प्रवेश झाले आहेत. ज्यात महानगरपालिकेतील सर्वात मोठा असणारा गट पाटील गट आहे. जयश्री पाटील यांनी याआधीच 22 जागा मागून भाजपला कोंडीत पाडले आहे. त्यांच्या गटाचे आधी 18 नगरसेवक होते. तर नुकसाच भाजपवासी झालेले पृथ्वीराज पाटील यांनाही काही जागा भाजपला द्याव्या लागणार आहे. त्यातच आमदार खाडे आणि गाडगीळ गटही आहे. यामुळे सध्या भाजप 50 एक जागांची चाचपणी कर आहे. उर्वरीत जागा जयश्री पाटलांसह इतरही प्रमुख चेहऱ्यांना सोडल्यास महायुतीतील मित्र पक्षांना सोबत घेता येणार नाही. त्यामुळेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून वेगळी रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे.

काँग्रेससह राष्ट्रवादीने दंड थोपाटले

महापालिकेत पुन्हा भाजप महायुतीचा झेंडा फडकावण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी मोठे पक्ष प्रवेश करून घेतले आहेत. त्यांनी चाल खेळत विरोधकांची रसदच तोडली आहे. त्यांच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे काँग्रेससह शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे आगामी निवडणुकीत भाजपसमोर इच्छुकांची भाऊगर्दी आणि गट-तटाला तोंड द्यावे लागणार आहे. मात्र काँग्रेस आता नव्याने पक्ष बांधणीकडे लक्ष देत असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी तन, मन, धन लावून निवडणूक लढवण्यासाठी दंड थोपाटले आहे.

chandrakant patil, vishwajeet kadam, Vishal patil, Jayant Patil And Sangli political battle
Sangli Politics : भाजप प्रदेशाध्यक्षांचं काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या घरी स्नेहभोजन : जेवताना पक्षप्रवेशाचा मुहूर्तही काढला

FAQs :

प्रश्न 1: सांगली महापालिकेची प्रभागरचना बदलली का?
➡️ नाही, 2018 प्रमाणेच कायम ठेवली आहे.

प्रश्न 2: भाजपसमोर कोणते आव्हान आहे?
➡️ पक्ष प्रवेशामुळे अंतर्गत डोकेदुखी वाढली आहे.

प्रश्न 3: काँग्रेसची भूमिका काय आहे?
➡️ काँग्रेसने साम, दाम, दंड वापरून लढण्याचा निर्धार केला आहे.

प्रश्न 4: राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका कशी आहे?
➡️ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून वेगळी भूमिका दिसते आहे.

प्रश्न 5: निवडणूक कशी होईल?
➡️ भाजप- काँग्रेस यांच्यात मोठी चुरस रंगणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com