Teachers Controversy : शिक्षण खात्यात खळबळ; सरकारी आदेशाला नकार देणाऱ्या शिक्षकांवर नागपूरनंतर मिरजमध्येही कारवाई

FIR Against Sangli Miraj Teachers Over voter list revision : नुकताच नागपूरमध्ये जनगणना 2026-27 च्या कामात सहभाग न घेणाऱ्या 10 शैक्षणिक कर्मचाऱ्यांविरोधात कडक कारवाई करत गुन्हा दाखल केला होता. ज्यामुळे शिक्षण खात्यात खळबळ उडाली होती. तर या कारवाईविरोधात संताप व्यक्त केला जात होता.
FIR Against Teachers
FIR Against TeachersSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. मिरज येथे मतदार पुनरिक्षणाच्या कामास नकार दिल्याने दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  2. संबंधित शिक्षकांना बूथ लेव्हल ऑफिसर म्हणून काम देण्यात आले होते, मात्र त्यांनी अनुपस्थित राहून काम नाकारले.

  3. यापूर्वी नागपूरमध्येही अशाच प्रकारे कारवाई झाल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

Sangli Miraj Teachers FIR News : देशभरात 1 एप्रिलपासून जनगणना 2026-27 च्या कामाला सुरुवात झाली आहे. जनगणनेचं काम शिक्षकांच्या खांद्यावर देण्यात आलं आहे. तसा आदेश निवडणूक आयोगाने काढला असून याला आता काही ठिकाणी विरोध होताना दिसत आहे. नुकताच नागपूरमध्ये या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली होती. जनगणना प्रक्रियेत सहभागी होण्यास टाळाटाळ करणाऱ्या तब्बल 10 शैक्षणिक कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता.

या कारवाईनंतर राज्यभर शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती. तोच आता सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात देखील अशीच कारवाई करण्यात आली आहे. तर दोघा शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्याच्या शिक्षण विभागात संताप व्यक्त केला जात आहे.

देशभरात जनगणना 2026-27 चे काम सुरू झाले असून नागपूर महापालिकेने देखील जनगणना प्रक्रिया सुरू केली आहे. त्या प्रमाणे शिक्षण विभागातील कर्मचारी आणि शिक्षकांची नियुक्ती जनगणना प्रक्रियेत करण्यात आली आहे. पण तब्बल 10 जणांनी या प्रक्रियेत सहभागी होण्यास टाळाटाळ केली. ज्यानंतर महानगरपालिकेच्या सतरंजीपुरा झोनमधील सहाय्यक आयुक्तांनी संबंधितांविरोधात तक्रार दाखल केली. ज्यात जनगणना प्रक्रियेसाठी देण्यात आलेले आदेश न पाळणे आणि कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

FIR Against Teachers
Teachers Summer Vacation : शिक्षकांच्या उन्हाळी सुट्टीच्या प्लॅनिंगला सुरुंग, तिसरी नवी जबाबदारी खांद्यावर येणार

तसेच IPC कलम 187 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत एक प्राचार्य, चार शिक्षक, एक मुख्याध्यापक अशा एकूण 10 शैक्षणिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर राष्ट्रीय कर्तव्य मानल्या जाणाऱ्या जनगणना प्रक्रियेत सहभाग टाळल्यामुळे ही कठोर कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. तर महानगरपालिकेने राष्ट्रीय कर्तव्य टाळणाऱ्यांना इशारा देताना, जनगणना हे अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय कर्तव्य असून त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर यापुढेही अशाच प्रकारे कडक कारवाई केली जाईल. आवश्यकतेनुसार आणखीही गुन्हे दाखल होऊ शकतात, असे म्हटले होते.

दरम्यान सांगली जिल्ह्यातही अशाच पद्धतीने मिरज येथील विद्या मंदिर शाळा आणि कन्या शाळेतील एक-एक शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षक सुधाकर बाबासाहेब बंडगर आणि शिक्षिका निर्मल मल्लू वाघमारे अशी शिक्षकांची नावे आहेत. तर त्यांच्यावर मतदार पुनरीक्षणाच्या कामास नकार दिल्याने मिरज येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जनगणना मोहिमेंतर्गत बूथ लेव्हल ऑफिसर म्हणून काम करण्याची जबाबदारी या दोघांना मिरज तहसीलदारांच्या मतदार पुनरीक्षण आदेशानुसार देण्यात आली होती. मात्र, या संबंधित दोन्ही शिक्षकांनी या कामासाठी नकार दिला व कामावर अनुपस्थित राहिले. यामुळे मंडळधिकारी अमोल सानप यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. ज्यानंतर शिक्षक सुधाकर बाबासाहेब बंडगर आणि शिक्षिका निर्मल मल्लू वाघमारे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

FIR Against Teachers
Teachers Retirement Age 55 : सत्यजीत तांबेंचा बॉम्ब: शिक्षकांचं सेवानिवृत्ती वय 55 असावं; राज्यभरात चर्चा रंगणार!

FAQs :

1. शिक्षकांवर गुन्हा का दाखल करण्यात आला?
मतदार पुनरिक्षणाच्या सरकारी कामास नकार दिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला.

2. कोणत्या ठिकाणी ही घटना घडली?
ही घटना सांगली जिल्ह्यातील मिरज येथे घडली.

3. शिक्षकांना कोणती जबाबदारी देण्यात आली होती?
त्यांना बूथ लेव्हल ऑफिसर म्हणून काम करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

4. यापूर्वीही अशी कारवाई झाली आहे का?
होय, नागपूरमध्येही अशाच प्रकारे शिक्षकांवर कारवाई करण्यात आली होती.

5. या प्रकरणामुळे काय परिणाम होऊ शकतो?
शिक्षकांमध्ये नाराजी वाढण्याची शक्यता असून शिक्षण विभागात चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com