स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी 17 एप्रिलला महासभेत निर्णय अपेक्षित
भाजप 4, काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादी 2 जागा मिळण्याची शक्यता
आठ जागांसाठी शेकडो इच्छुकांमुळे राजकीय स्पर्धा तीव्र
Sangli News : सांगली महानगरपालिकेची निवडणूक होऊन दोन महिने उलटले असून पुन्हा एकदा येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सध्या सभागृहात ७८ नगरसेवक असून स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी कधी होणार असा सवाल आता सर्वच पक्षांमध्ये केला जात आहे. तसेच या प्रश्नाने इच्छुकांची घालमेल वाढली असतानाच आता १७ एप्रिलला महासभा होणार आहे. याच महासभेत आठ स्वीकृत नगरसेवकांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तर भाजप ४, काँग्रेस २, राष्ट्रवादी २ जागा मिळणार आहेत.
नुकताच सांगली महानगरपालिकेची निवडणूक पार पडली असून महायुतीची सत्ता स्थापन केली आहे. महापालिकेत भाजपचे ३९, काँग्रेसचे १८, राष्ट्रवादी काँग्रेसचे १६, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष ३, शिवसेना २ असे सदस्य निवडून आले आहेत. यामुळे महानगरपालिकेत आठ स्वीकृत नगरसेवक जाणार आहेत. संख्याबळानुसार भाजप ४, काँग्रेस २, राष्ट्रवादीचे २ असे स्वीकृत नगरसेवक निवडता येणार आहेत.
पण सध्याची स्थिती पाहता ‘स्वीकृत’च्या आठ जागांसाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली झाली असून तिन्ही पक्षांकडे शेकडो कार्यकर्त्यांनी अर्ज केले आहेत. तर आता निवडीला फक्त १० दिवस उरले असून इच्छुकांकडून हालचालींना वेग आला आहे. दरम्यान इच्छुकांची सर्वाधिक संख्या भाजपमध्ये दिसत आहे. पण शेवटी निर्णय हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे घेणार आहे. मात्र भाजपकडून धक्कातंत्राचा वापर होण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे.
एकीकडे स्वीकृत नगरसेवक पदासाठी पात्र उमेदवारांची निवड करताना शैक्षणिक, सामाजिक, तसेच विविध क्षेत्रांतील योगदानाचा विचार केला जातो. मात्र आतापर्यंत पराभूत उमेदवारांनाच ‘स्वीकृत’ची संधी दिली जाते असाच पॅटर्न आहे. पण राज्यातील विविध ठिकाणी धक्कातंत्राचा वापर केला जात आहे. सध्या पक्षाचा निकष हा पराभूत उमेदवारांना ‘स्वीकृत’ची संधी दिली जात नाही, असाच आहे.
दरम्यान आता इच्छुकांची सर्वाधिक संख्या भाजपकडून असून महापलिका निवडणुकी पराभूत झालेले काही प्रमुख नेते आपले पुनर्वसन होणार का? भाजप निकष बदलणार का याकडे लक्ष ठेवून आहेत. यामुळे ‘स्वीकृत’च्या रेसमध्ये नव्या नावांसह जुन्यांचा भर पडली आहे. स्वीकृत पदासाठी भाजपकडून केदार खाडिलकर, विश्वजित पाटील, सुजीत राऊत, शीतल लोंढे, विजय पाटील, पांडुरंग कोरे, बाबासाहेब आळतकेर, राहुल बोळाज इच्छुक आहेत.
काँग्रेस शहराध्यक्ष राजेश नाईक यांच्याकडे ४० इच्छुकांनी अर्ज केले असून पक्ष कार्यालयात आलेले अर्ज त्यांनी खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम यांच्याकडे पाठवले आहेत. काँग्रेसकडून इच्छुकांनी थेट दोन्ही नेत्यांकडेही ‘स्वीकृत’साठी ‘फिल्डिंग’ लावली आहे. दरम्यान निवडीबाबत निकष काय असावेत, याचे धोरण ठरले नसल्याचे शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी सांगितले आहे. तर अमित शहा, प्रमोद सूर्यवंशी, विशाल कलगुटगी यांच्यासह अनेकजण इच्छुक आहेत.
राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून सचिन सावंत, स्नेहल सावंत, जयंत जाधव, आयेशा नायकवडी, राधिका हारगे, जावेद मोमीन, सतीश कांबळे यांच्यासह अनेक इच्छुक आहेत. स्वीकृत नगरसेवकच्या ८ पदांसाठी प्रचंड चुरस पाहायला मिळत असून नामनिर्देशित सदस्यांचे अर्ज दि. १० एप्रिलरोजी कार्यालयीन वेळेत द्यावेत, असे पत्र नगरसचिवांनी नगरसचिवांनी भाजपचे गटनेते संदीप आवटी, काँग्रेसचे गटनेते मंगेश चव्हाण, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांना दिले आहे. सध्या तिन्ही पक्षांकडे इच्छुकांची संख्या मोठी असून चुरस दिसणार आहे.
दरम्यान स्वीकृत नगरसेवक नियुक्तीनिमित्ताने भाजप व काँग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण पुन्हा दिसणार आहे. आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील हे आपल्या समर्थकांना संधी देण्यासाठी प्रयत्नशील राहतील. तर काँग्रेसमध्ये दोनपैकी एक जागा खासदार विशाल पाटील समर्थकाला, तर दुसरी जागा आमदार डॉ. विश्वजित कदम समर्थकाला मिळेल. राष्ट्रवादीमध्ये दोनपैकी एका जागेवर सचिन सावंत यांचे नाव निश्चित मानले जात आहेत.
1. स्वीकृत नगरसेवकांची निवड कधी होणार?
17 एप्रिल रोजी होणाऱ्या महासभेत निर्णय होण्याची शक्यता आहे
2. किती जागांसाठी निवड होणार आहे?
एकूण 8 स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार आहे
3. कोणत्या पक्षांना किती जागा मिळू शकतात?
भाजप 4, काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादी 2 जागा मिळण्याची शक्यता आहे
4. किती इच्छुक आहेत?
आठ जागांसाठी शेकडो इच्छुक असल्याचे समोर आले आहे
5. भाजपची रणनीती काय आहे?
काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची चर्चा सुरू आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.