
सांगली महापालिकेच्या प्रभागरचनेत यंदा कोणताही बदल झालेला नाही.
आरक्षण जाहीर झालेले नसले तरी इच्छुक तयारीस सुरुवात करणार आहेत.
काँग्रेस नेते विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी थेट भाजपविरोधात घोषणा केली.
काँग्रेसने "महापालिका जिंकणारच" असा जाहीर निर्धार केला आहे.
त्यांच्या निर्धाराची आणि पदाधिकाऱ्यांना दिलेल्या कानमंत्राची चर्चा जोरात आहे.
Sangli News : आगामी स्थानिकसाठी भाजपसह महायुतीतील मित्र पक्षांनी आधीच रणनीती आखत पक्ष फोडीकडे विशेष लक्ष दिले होते. ज्यामुळे काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मोठे नुकसान झाले आहे. भाजपने काँग्रेसचा गड असणाऱ्या वसंतदादा घराण्यालाच सुरूंग लावत जयश्रीताईंना फोडले आहे. यामुळे आर्धी काँग्रेस संपल्यात जमा झाल्याची चर्चा होती. त्या पाठोपाठ भाजपने पुन्हा सुरूंग लावत जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटलांनाच भाजपमध्ये ओढले यामुळे आणखी काँग्रेसचे बुरूज ढासळू लागले आहेत. अशातच आता महापालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाल्याने काँग्रेसने कंबर कसली आहे. काँग्रेस नेते विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी थेट भाजपविरोधात दंड थोपाटले असून 'आम्ही इर्षेने पेटलोय, महापालिका जिंकणारच', असा निर्धार केला आहे. सध्या त्यांच्या निर्धाराची आणि त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या कानमंत्राचीच जोरदार चर्चा सुरू आहे.
यावेळी महापालिका निवडणूक लढू इच्छिणाऱ्याने आत्मपरीक्षण करावे, लोकांत जावे, काम करावे. बाकीची चिंता माझ्यावर आणि विशाल पाटलांवर सोडावी. आम्ही आता इर्षेने पेटलोय. साम, दाम, दंड वापरू, मात्र ही महापालिकेची निवडणूक आपण जिंकून दाखवू, असा विश्वास आमदार विश्वजित कदम यांनी आज व्यक्त केला. ते काँग्रेस कमिटीत आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, युवा नेते जितेश कदम उपस्थित होते. ज्येष्ठ नेते प्रा. सिकंदर जमादार, अय्याज नायकवडी, माजी नगरसेवक राजेश नाईक, संजय मेंढे, मंगशे चव्हाण, शेवंता वाघमारे, वर्षा निंबाळकर, सेवा संघाचे अध्यक्ष अजित ढोले आदी प्रमुख उपस्थित होते.
वसंतदादा गट आणि कदम गटावर राजकीय दुकान चालवणाऱ्यांना थेट इशारा देत विश्वजित कदम यांनी आक्रमक भाषण केले. ते म्हणाले, ‘काँग्रेस एकसंघ झाली आहे. गट राहिलेला नाही. लोकसभा निवडणुकीत काय झाले तुम्ही पाहिले. यापुढेही काँग्रेससाठी रान उठवू, मात्र गटाची भाषा बंद करा. मी सांगलीत लक्ष घातले, तर अडचण होईल, असे काहीजण विशाल पाटलांचे कान फुंकतात. मला येऊन काहीतरी वेगळं सांगतात, चालणार नाही. एकजुटीने पुढे जायचे आहे. आम्ही दोघे सांगलीत फिरायला लागलो, तर विरोधी पक्षाचे पालकमंत्री, आमदार, मोठी यंत्रणा सारे असूनही लोक सोबत उभे राहतील, हा माझा विश्वास आहे. त्यासाठी आधी तुम्ही उमेदवार म्हणून सक्षम व्हा. लोकांचा विश्वास जिंका. अडचणीत, सुख-दुःखात उभे राहा. बाकी तुमच्या केसाला धक्का लागणार नाही, याची जबाबदारी आमची. मी ढाल बनून उभे राहू.’
विशाल पाटील म्हणाले, ‘प्रभाग रचना जाहीर झाली आहे. काही शंका असतील, तर आपण त्यासाठी समिती गठीत करत आहोत. त्यांच्याशी संपर्क साधा. मतदार यादीवर लक्ष ठेवा. मतचोरी होते आहे का पाहा. दक्ष राहा. कोण पक्षात होते, निघून गेले काळजी करू नका. ज्यांना जायचे होते, ते गेले, आता आपण आहोत, एकजुटीने लढू.’
गेलेल्यांनी टीका थांबवावी
पृथ्वीराज पाटील यांचे नाव न घेताना आमदार विश्वजित कदम यांनी टीकास्त्र डागले. ते म्हणाले, ‘हे काँग्रेसमध्ये होते तेव्हा प्रमुख नेते होते, त्यांचा सन्मान होता. आज त्या गर्दी त्यांचे स्थान कुठे आहे, शोधावे. जे तीन लोक एकमेकांविरुद्ध सांगलीत लढले तेच आता एका पक्षात एकत्र आले आहेत. हीच खरी गंमत आहे. तुम्ही गेलात, हरत नाही; मात्र नाहक आमच्यावर टीका करण्याचे काम करू नये. अन्यथा मी बोलल्यावर त्यांची काही खैर नाही अशा खणखणीत इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच तुम्हाला दोनवेळा उमेदवारी दिली, तुमचे प्रामाणिक काम केले. याहून अधिक बोलायची वेळ येऊ नये.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला आत्मविश्वास सोडू नये. पुन्हा जोमाने कामाला लागावे. आता प्रभाग रचनाही जाहीर झाली आहे. त्यामुळे आपल्याला आणखी दुप्पट जोमाने कामाला लागावे लागेल. कोणत्याही भुलथापांना बळी न पडता तात्काळ लोकांशी संपर्क वाढवा. आपल्या पाठिशी जनता असून विजय आपलाच आहे.
तर आजही ‘राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आहे. आमदार जयंत पाटील, आमदार रोहित पाटील यांच्याशी आम्ही निश्चितपणे आघाडीबाबत चर्चा करू, शिवसेनेसोबत चर्चा करू. एकजुटीने लढण्याचाच आमचा प्रयत्न असेल.’ कोणत्याही परिस्थितीत सांगली महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवायचा आहे. त्यासाठी आम्ही इर्षेने पेटलोय, त्यासाठी आता झपाटून काम करायचे आहे. तर यासाठी समविचारी पक्षही आपल्यासोबत असतील असेही विश्वजीत कदम म्हणाले.
प्रश्न 1: सांगली महापालिकेच्या प्रभागरचनेत बदल झाला का?
➡️ नाही, यंदा कोणताही बदल झालेला नाही.
प्रश्न 2: आरक्षणाबाबत काय स्थिती आहे?
➡️ आरक्षण अद्याप जाहीर झालेले नाही.
प्रश्न 3: काँग्रेसची भूमिका काय आहे?
➡️ काँग्रेसने भाजपविरोधात लढण्याचा निर्धार केला आहे.
प्रश्न 4: कोणते नेते आघाडीवर आहेत?
➡️ विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील हे नेते आघाडीवर आहेत.
प्रश्न 5: सध्या चर्चेत काय आहे?
➡️ काँग्रेसच्या निर्धाराची आणि कानमंत्राची चर्चा जोरात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.