Sangali MahaPalika Result : सांगलीत 39 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष; सत्तेच्या चाव्या निवडणुकीपूर्वी डावलेल्या शिवसेनेच्या हाती

Sangli Municipal Corporation Results : सांगली महापालिकेत भाजप 39 जागांसह बहुमतापासून एक पाऊल दूर आहे. शिंदे शिवसेनेच्या दोन जागांमुळे सत्ता आणि महापौरपदाची चावी आता त्यांच्या हाती आली आहे.
BJP leaders celebrate Sangli Municipal Corporation results as party reaches 39 seats, while Shinde Shiv Sena MLAs emerge as kingmakers in closely fought civic election.
BJP leaders celebrate Sangli Municipal Corporation results as party reaches 39 seats, while Shinde Shiv Sena MLAs emerge as kingmakers in closely fought civic election.sarkarnama
Published on
Updated on

Sangali Mahapalika Result News : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत 78 जागांपैकी भाजप 39 जागा जिंकत सत्तेच्या काठावर जाऊन थबकली आहे. काँग्रेसने 18, अजित पवार राष्ट्रवादीने 16 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार 3 जागा, शिवसेनेने 2 जागा जिंकल्या. शिवसेनेच्या या 2 जागांचा पाठिंबा मिळवला तर भाजप महापौरपद सहज पदरात टाकू शकतो. दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्याशी निकालानंतर चर्चा केल्याचे समजते.

गतवेळी भाजप स्वबळावर 41 जागा जिंकत 2 अपक्षांच्या पाठिंब्यासह 43 जागांसह सत्तेत होता. महापालिकेत सत्ता पुन्हा मिळवायचीच या इराद्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयश्री पाटील आणि पृथ्वीराज पाटील या दोन काँग्रेस नेत्यांना पक्षात घेऊन काँग्रेसला खिंडार पाडले.

2 महिन्यात काँग्रेस-राष्ट्रवादीतून मोठे इनकमिंग झाले. त्यानंतरही या निवडणुकीत भाजपला सत्तेच्या काठावर जाऊन थबकावे लागले. दुसरीकडे काँग्रेस व शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महाआघाडी आणि त्याला अंडरस्टँडिंगने साथ देणारी अजित पवार यांची राष्ट्रवादी अशी विरोधी मांडणी झाली.

त्याचा दृष्य परिणाम म्हणून आघाडीला 21 तर राष्ट्रवादीला 16 अशा विरोधकांच्या 37 जागा झाल्या. जयंत पाटील, विशाल पाटील, विश्वजीत कदम, इद्रिस नायकवडी, संजय पाटील या मातब्बरांनी केलेल्या रचनेलाही काठावरचे यश मिळाले. या लटकलेल्या स्थितीत एकनाथ शिंदे यांच्या हाती 2 जागी यश लागले आणि सत्तेचा पासंग आता त्यांच्या हाती गेला आहे. गावभागातील युवराज बावडेकर, मिरजेतील सागर वनखंडे यांना सोबत घेतले की भाजपला बहुमतात जाता येईल.

BJP leaders celebrate Sangli Municipal Corporation results as party reaches 39 seats, while Shinde Shiv Sena MLAs emerge as kingmakers in closely fought civic election.
BMC Election Results : 'एक्झिट पोल्स'ची आकडेवारी समोर येताच फडणवीसांनी निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंबाबत केलेली 'ती' भविष्यवाणी चर्चेत

या निवडणुकीत भाजपच्या मातब्बरांना धक्का बसला आहे. माजी आमदार दिनकर पाटील यांच्या सूनाबाई, पृथ्वीराज पवार यांचे जवळचे कार्यकर्ते पराभूत झाले. शेखर इनामदारांच्या गडात विरोधकांनी खिंडार पाडले. भाजप शहराध्यक्ष प्रकाश ढंग यांना पराभवाचा धक्का बसला. खासदार विशाल पाटलांचे पुतणे संपूर्ण पॅनेलसह विजयी झाले. श्रीमती जयश्री पाटील यांचे कट्टर समर्थकही पराभूत झाले.

BJP leaders celebrate Sangli Municipal Corporation results as party reaches 39 seats, while Shinde Shiv Sena MLAs emerge as kingmakers in closely fought civic election.
Municipal Election Result : भाजपचा महाविजय! सात शहरांत पहिल्यांदाच 'कमळ' फुलले, विरोधकांचा सुपडा साफ!

मिरज शहरातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी ऐनवेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यातील बहुतांश मंडळींना यश आले. तिथे भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांची राष्ट्रवादीला ताकद देत भाजपची कोंडी केली होती. आरापात जिंकेल असे वाटणारे तीन उमेदवार तिथे पराभूत झाले. हक्काचा खणभाग भाजपने गमावला. गावभागात भाजपला धक्का बसला आणि आता एका जागेसाठी त्यांना जुळवाजुळव करावी लागत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com