

सांगली महापालिकेची महासभा शुक्रवारी होणार असून त्यात स्वीकृत नगरसेवकांची निवड केली जाणार आहे.
गटनेत्यांकडून अनेक नावांची यादी सादर झाली असून त्यातून अंतिम निवड करणे मोठे आव्हान आहे.
जास्तीत जास्त लोकांना संधी देण्यासाठी दरवर्षी बदल करण्याचा निर्णय घेऊन पाच वर्षांत ४० जणांना संधी देण्याचा विचार आहे.
Sangli Political News : सांगली महापालिकेची महासभा येत्या शुक्रवारी (ता.१७) होणार आहे. याच सभेत स्वीकृत नगरसेवक निवडी होणार आहेत. त्यासाठी गटनेत्यांकडून महापौरांना पत्रे दिली जाणार आहेत. त्याआधी नेत्यांकडे पाच पन्नास नावांची यादी दाखल झाली आहे. त्यातून दोन-चार नावे निश्चित करण्याचे दिव्य नेत्यांपुढे आहे.
त्यावर उपाय म्हणून दरवर्षी नव्याने निवडी करण्याचा पायंडा पाडून जास्तीत जास्त जणांना संधी दिली जाणार आहे. तर पाच वर्षांत ४० जणांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्याचा नेत्यांचा मनोदय आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी विविध राजकीय पक्ष, तसेच इच्छुकांकडून हालचालींना वेग आला आहे.
पात्र उमेदवारांची निवड करताना शैक्षणिक, सामाजिक, तसेच विविध क्षेत्रांतील योगदानाचा शासन आदेशापुरता विचार केला जातो. त्यादृष्टीने कागदपत्रांची जुळवाजुळव करून सर्वांनी नेत्यांकडे ‘फिल्डिंग’ लावली आहे.
सध्या महापालिकेत भाजपचे ३९, काँग्रेसचे १८, राष्ट्रवादी काँग्रेसचे १६, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ३, शिवसेना २ असे बलाबल आहे. संख्याबळावर पहिल्या तीन पक्षांना अनुक्रमे ४, २, २ असे स्वीकृत नगरसेवक निवडता येणार आहेत. निवडणुकीआधी नेत्यांनी प्रत्येकालाच ‘स्वीकृत’चा शब्द दिल्याने आता सारेच सरसावले आहेत.
पराभूत उमेदवारांना ‘स्वीकृत’ची संधी दिली जाणार नाही, असे सर्वच नेत्यांनी स्पष्ट केले आहे. तथापि महापालिकेत कारभार हाती ठेवण्यासाठी अनुभवी मर्जीतील लोक पाठवण्याचा नेत्यांचा इरादा आहे. काँग्रेस शहराध्यक्ष राजेश नाईक यांनी नेत्यांकडे ४० इच्छुकांनी यादी पाठवल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ३५ इच्छुकांची यादी असल्याचे शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी सांगितले.
इनामदारांना पुन्हा संधी?
शेखर इनामदार गेल्यावेळी ‘स्वीकृत’ म्हणूनच सभागृहात होते. यावेळीही ते सभागृहात जाणार का, याबद्दल कुतूहल आहे. ते ‘स्वीकृत’ झाले तर त्यांचा सत्तेवर अंकुश राहू शकतो. आता तो तसा ठेवण्याबाबत भाजपश्रेष्ठी कितपत इच्छुक आहेत, हेही यानिमित्ताने स्पष्ट होईल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ यांच्यातील सहमतीवर हे ठरणार आहे.
1. सांगली महापालिकेची महासभा कधी होणार आहे?
महासभा येत्या शुक्रवारी आयोजित करण्यात येणार आहे.
2. स्वीकृत नगरसेवकांची निवड कशी होणार आहे?
गटनेत्यांनी दिलेल्या नावांच्या यादीतून काही नावे निवडली जाणार आहेत.
3. किती जणांना संधी देण्याचा विचार आहे?
पाच वर्षांत सुमारे ४० जणांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्याचा विचार आहे.
4. रोटेशन पॉलिसी म्हणजे काय?
दरवर्षी नवीन सदस्यांची निवड करून जास्तीत जास्त लोकांना संधी देण्याची पद्धत.
5. निवडीपूर्वी काय प्रक्रिया झाली आहे?
गटनेत्यांनी महापौरांकडे संभाव्य उमेदवारांची यादी सादर केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.