

Sangali News: मिरज पंचायत समितीमध्ये मिरज पॅटर्न राबवल्यानंतर महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेते जिल्हा परिषदेच्या राजकारणात ऍक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. खासदार विशाल पाटील यांनी जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसची सत्ता आणूनच दाखवावी, असे जाहीर आव्हान भाजपच्या नेत्यांनी दिल्यानंतर काँग्रेस नेत्यांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपच्या ऑपरेशन लोटसला केराची टोपली दाखवत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य सहलीवर पाठवले.
त्यामुळे जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता आणू पाहणाऱ्या भाजपला धक्का बसला आहे. शिवसेनेची भूमिका काय असणार? याकडे सांगलीवासियांचे लक्ष लागले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर शिवसेनेच्या दोघा सदस्य महाविकास आघाडीच्या सदस्यांबरोबर सहलीवर जात नॉट रिचेबल झाले आहेत.
सांगली जिल्हा परिषदेवर भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत काँग्रेस सह 36 सदस्य अज्ञातस्थळी गेले आहेत. कोणतीही दगाबाजी होऊ नये, यासाठी खबरदारी घेत महाविकास आघाडीतील नेत्यांनी झेडपी मध्ये मिरज पॅटर्न करण्याची रणनीती आखली आहे. 19 मार्च रोजी अध्यक्ष निवड होत असल्याने 36 सदस्य गायब आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्याचे राजकारण तापले असताना शिवसेनेची भूमिका काय असणार याकडे लक्ष लागले होते. मात्र शिवसेनेतील दोन सदस्यांनी महाविकास आघाडी सोबत अज्ञात स्थळी जाण्याची भूमिका घेतली आहे.
सांगली जिल्हा परिषदेमध्ये 32 सदस्यांची आवश्यकता आहे. महायुतीकडे काठावरचे बहुमत आहे. त्यातील निम्मे भाजप जनसुराज्य आणि रयत क्रांती संघटना असे एकूण 18 आहेत. शिवाय भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने शिवसेना सोबत घ्यावे तर शिवसेनेकडे सात सदस्य आहेत. त्यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन होणे मुश्कील आहे. यापूर्वीच शिवसेनेने देखील भाजपला पाठिंबा देण्यास नकार भूमिका घेतली आहे.
शिवसेनेने अद्याप जाहीर केले नसले तरी शिवसेनेचे दोन सदस्य महाविकास आघाडीच्या सदस्यांसोबत थंड हवेच्या ठिकाणी रवाना झाले आहेत. यापूर्वीच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंची सेना एकत्र येत अज्ञात स्थळी गेले असताना त्यांच्यासोबत शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे दोन सदस्य रवाना झाल्याची माहिती आहे. दोघेही सदस्य हे आटपाडी तालुक्यातील आहेत. या सदस्याने आपले फोन स्विच ऑफ केले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.