Jayant Patil : सातारा-सांगली विधानपरिषदेच्या उमेदवारीत शिवेंद्रराजे अन् उदयनराजेंना डावललं; साधी दखलही घेतली नाही : जयंत पाटलांचा वर्मी घाव

Jayant Patil on Satara MLC Election : दोन्ही राजेंचा विचारात न घेतल्यामुळे त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला असून, अशा गोष्टी खपवून घेणे हा उदयनराजेंचा स्वभाव नाही. त्यामुळे सातारकरांनी आपला स्वाभिमान काय आहे? हे या निवडणुकीत मतदानातून दाखवून द्यावे असं आवाहन पाटील यांनी केलं.
udayanraje bhosale, Shivendraraje Bhosale, Jayant Patil
NCP (Sharad Pawar faction) leader Jayant Patil addresses the media in Satara during the Sangli-Satara MLC election campaign, urging voters to uphold Satara's self-respect through their vote.Sarkarnama
Published on
Updated on

Satara MLC Election : सांगली सातारा विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने देखील चांगला जोर लावला आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीतील मित्र पक्षांमध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकी दरम्यान झालेल्या राड्याची आठवण करून देत आता सातारकरांनी आपला स्वाभिमान काय आहे? हे या निवडणुकीत दाखवून द्यावे असं आवाहन शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी साताऱ्यातून केलं आहे.

शिवाय महायुतीमध्ये साताऱ्याच्या दोन्ही राजांना विचारत न घेताच निर्णय घेतले जात असावेत असा माझा अंदाज असल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे. सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील आज सातारा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य केलं.

यावेळी त्यांनी सातारा जिल्हा परिषदेत जे राजकीय नाट्य घडले होते त्या विरोधातील राग मतदानातून व्यक्त करण्याची हीच पहिली आणि शेवटची संधी असल्याचं सांगत कार्यकर्त्यांनी आपला राग मतपेटीतून दाखवून द्यावा आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचं आवाहन केलं.

udayanraje bhosale, Shivendraraje Bhosale, Jayant Patil
Meenakshi Natarajan : ना FIR, ना पोलीस तपास, ना शिक्षा..., तरीही काँग्रेसच्या मिनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद कसा झाला? लपवलेलं प्रकरण नेमकं काय आहे?

यावेळी त्यांनी महायुतीमध्ये साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही राजांना विचारत न घेताच निर्णय घेतले जात असावेत असा माझा अंदाज असल्याचं वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी हा फक्त माझा अंदाज आहे, दावा नव्हे, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

शिवाय दोन्ही राजेंचा विचारात न घेतल्यामुळे त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला असून, अशा गोष्टी खपवून घेणे हा उदयनराजेंचा स्वभाव नाही, असंही जयंत पाटील म्हणाले. त्यामुळे सातारकरांनी आपला स्वाभिमान काय आहे? हे या निवडणुकीत मतदानातून दाखवून द्यावे असं आवाहन पाटील यांनी केलं.

udayanraje bhosale, Shivendraraje Bhosale, Jayant Patil
Congress conflict : परस्पर कारभार करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळांना घरचा रस्ता दाखवा : पुण्यातील काँग्रेस नगरसेवकाची थेट प्रदेशाध्यक्षांविरोधातच दिल्लीकडे तक्रार

तसंच आम्ही केवळ विकास आणि जनतेच्या मुद्द्यांवर मते मागतोय आमच्याकडे मसल आणि मनी पॉवर वापरण्याची पद्धत नाही. आता जनताच पैशांच्या राजकारणाला उत्तर देईल, असंही ते म्हणाले. त्यामुळे आता जयंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे महायुतीतील जुन्या वाद नव्याने चर्चेत आला असून झेडपीच्या निवडणुकीतील राग मित्र पक्षाचे कार्यकर्ते खरंच विधान परिषदेच्या निवडणुकीतून काढणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com