

Sangali News: सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्यात पुन्हा एकदा वाक्य युद्ध सुरू झाले आहे. शक्तिपीठ महामार्गाला वाळवा तालुक्यातून विरोध होत असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे.
शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीतील नेत्यांनी जी धरणं, रस्ते बांधलेत, ते आकाशात बांधलेत का? वाळव्यातील ‘त्या’ माणसांना काही कामच नाही. इतकी वर्षे मंत्री असताना त्यांना सांगली-पेठ मार्ग करता आला नाही,’’ अशी टीका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
कोणताही विकास प्रकल्प उभारताना जमिनी घ्याव्या लागतात. त्यातून प्रचंड विकास साधला जातो आणि लाखो लोकांना त्याचा फायदा होतो. शक्तिपीठ महामार्ग असाच प्रगतीचा मार्ग ठरणार आहे. पण शक्तिपीठ महामार्गाला वाळवा तालुक्यातून सर्वाधिक विरोध होत आहे. वाळव्यातील ‘त्या’ माणसांना काही कामच नाही. इतकी वर्षे मंत्री असताना त्यांना सांगली-पेठ मार्ग करता आला नाही,’ अशी टीका त्यांनी आमदार जयंत पाटील यांचे नाव न घेता केली.
पालकमंत्री म्हणाले, ‘‘उगाच विरोध म्हणून विरोध करण्यात अर्थ नाही. काही मंडळी देवाभाऊंची टिंगलटवाळी करतात. आम्ही त्यांच्यावर बोलायला लागलो तर त्यांना ते सहन होणार नाही. आमचे सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करणारे नाही, तर विकास करणारे आहे. ‘अटल सेतू’, ‘मिसिंग लिंक’सारखे प्रकल्प उभारताना जमिनी घ्याव्याच लागल्या. तुम्ही चर्चा करा. गरज असेल तर मार्ग वळविण्याची मागणी करा. मोबदल्यावर चर्चा करा. सरकार तयार आहे. नाहक विरोध कशासाठी?’’असा सवाल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.
‘चंद्रकांत पाटील हेच सर्वाधिक इंधन वापरतात,’ अशी उपरोधिक टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्यांनी घोड्यावरून रपेट मारत पंतप्रधान मोदींच्या आवाहनाची खिल्ली उडविली होती. त्याला प्रत्युत्तर देताना पाटील म्हणाले, ‘‘आव्हाड यांनी घोड्यावर नव्हे, तर उंटावर बसायला हवे. कारण ते ज्या समुदायाला रिप्रेझेंट करतात, त्या समुदायाचे वाहन उंट आहे. घोडा हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वाहन होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.