Mahayuti Government : महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला ठाकरे, पवार, गांधी, पटोलेंना आमंत्रण?

Mahayuti government oath ceremony December 5 Mumbai: महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित होणार आहे.
Mahayuti Government
Mahayuti GovernmentSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानात होणार आहे. यासाठी भाजप महायुतीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह प्रमुख भाजप, महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थित हा सोहळा पार पाडणार आहे.

या सोहळ्याला देशातील 22 मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. तसंच 2 हजारांवर व्हीव्हीआयपींना आमंत्रित करण्यात आले आहे. याचबरोबर महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी, नाना पटोले यांच्यासह प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे का? याची चर्चा रंगली आहे.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीविरुद्ध (Mahayuti) महाविकास आघाडी, असा सामना रंगला. यात महायुतीला 233 जागांवर अभुतपूर्व यश मिळाले. महायुतीत भाजपला सर्वाधिक 132 जागा मिळाल्या. भाजपचा हा रेकाॅर्ड ठरला आहे. महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या. महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 20, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागा जिंकल्या आहेत.

Mahayuti Government
TOP Ten News : मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांच्या जागी कोणी दुसरं.., राहुल गांधींना कोर्टाचं समन्स.., वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. महायुतीकडून आता सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. परंतु मुख्यमंत्रिपदावरून आणि गृहमंत्रिपदावरून भाजप अन् शिवसेनामध्ये नाराजीनाट्य रंगले आहे. महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून शपथविधीची जय्यत तयारी सुरू असताना, एकनाथ शिंदे यांची शिवसेना (Shivsena) लांब आहे. भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी जवळपास देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित मानले जात आहे. परंतु भाजपने ते अजून जाहीर न करून उत्सुकता वाढवली आहे.

Mahayuti Government
Amol Mitkari : ...म्हणून रोहित पाटलांना मुख्य प्रतोद केलं; 'चंगु मंगू'ना उत्तर देणार नसल्याचा रोहित पवारांचा मिटकरींना टोला

मात्र महायुतीमधील शिवसेनेचे पक्ष प्रमुख तथा काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरवतालीच्या एक वर्षे मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी गळ घातली होती. त्यानंतर त्या अटीवरून मागे फिरत गृहमंत्रीपद शिवसेनेला मिळावे, यावर ठाम राहून शपथविधीच्या सोहळ्याच्या तयारीपासून लांब राहिले आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये अलबेल नसल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नेते प्रवीण दरेकर आणि राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे यांनी मुंबई आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याच्या तयारीची पाहणी केली. या पाहणीपासून एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्षाचे नेते लांब राहिले.

ठाकरे, पवार यांच्यासह 'मविआ'तील नेत्यांना आमंत्रण?

महायुतीत हे नाराजीनाट्य रंगले असतानाच, भाजप महायुतीकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांना शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण देण्यात येणार का? याची चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी, नाना पटोले यांच्यासह प्रमुख नेत्यांना आमंत्रण असेल का? अशी देखील चर्चा रंगली आहे. याशिवाय मनसेचे प्रमुख राज ठाकरे, बच्चू कडू, छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टी, एमआयएमचे खासदार असुद्दीने औवेसी, मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे यांना आमंत्रण असणार आहे, याची देखील चर्चा रंगली आहे.

'लाडक्या बहिणीं'ना विशेष आमंत्रण

महायुतीने शपथविधीसाठी 2 हजार व्हीव्हीआयपी पासेस दिले आहेत. देशातील 22 मुख्यमंत्री यांना आमंत्रण असणार आहे. तसेच तीन स्टेटजी उभारणी करण्यात आली आहे. लाडक्या बहिणींना विशेष आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच राज्यासह देशातील प्रमुख संत, अध्यात्मिक गुरू, धर्मप्रसारकांना विशेष आमंत्रण देण्यात आले आहे. 40 हजार जणांची उपस्थिती राहील, असे नियोजन करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com