Sanjay Shinde Vs Narayan Patil : नारायण पाटलांची संजय शिंदेंवर सडकून टीका; ‘ज्यांच्यासोबत त्यांनी मैत्री केली, त्यांचा विश्वासघातच केलाय’

Adinath Sugar Factory Election Result : संजय शिंदे यांनी आजपर्यंत एकाही सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद दिलेली नाही, ती माढा तालुक्यातही दिली नाही आणि करमाळा तालुक्यातील कार्यकर्त्यालाही दिली नाही.
Narayan Patil-Sanjay Shinde
Narayan Patil-Sanjay ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 20 April : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने २१-० अशा विजय मिळवून माजी आमदार संजय शिंदे यांच्या पॅनेलचा धुव्वा उडविला आहे. विशेष म्हणजे माजी आमदार संजय शिंदे यांचाही या निवडणुकीत पराभव झाला. विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यांत माजी आमदार संजय शिंदे यांना पराभवाला समोरे जावे लागले आहे. कारखान्याच्या निवडणुकीतील विजयानंतर आमदार नारायण पाटील यांनी माजी आमदार संजय शिंदेंवर सडकून टीका केली आहे.

माजी आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde) हे राजकारण करायाच्या लायकीचे नाहीत. त्यांनी एखाद्या कार्यकर्त्याचे कल्याण केले आहे, असे आम्हाला ऐकिवात नाही. त्यांनी ज्यांच्यासोबत मैत्री केली, त्यांचा विश्वासघातच केला आहे. त्यांना फसविण्याचे काम संजय शिंदे यांनी केले आहे. ते खोटारडे आणि स्वतःचे हित पाहणारे आहेत, असा हल्लाबोल आमदार नारायण पाटील यांनी शिंदेंवर केला.

आमदार नारायण पाटील (Narayan Patil) म्हणाले, संजय शिंदे यांनी आजपर्यंत एकाही सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद दिलेली नाही, ती माढा तालुक्यातही दिली नाही आणि करमाळा तालुक्यातील कार्यकर्त्यालाही दिली नाही. फक्त वापरून घ्यायचे आणि सोडून द्यायचे, अशी संजय शिंदे यांची प्रवृत्ती आहे, त्यामुळे त्यांना राजकारणात आगामी काळात कसलंही भविष्य राहणार नाही, असे मला वाटतं.

Narayan Patil-Sanjay Shinde
Narayan Patil : ‘आदिनाथ’च्या निवडणुकीत बागल गटाबरोबरच भाजपच्या ‘बड्या नेत्या’नेही मदत केली; आमदार नारायण पाटलांचा गौप्यस्फोट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजय शिंदे आणि दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांचे तीन पॅनेल होते. मात्र, खरी लढत ही आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार संजय शिंदे यांच्या पॅनेलमध्ये झाली. आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत नारायण पाटील गटाला मतदानाच्या दिवशी बागल गटाने पाठिंबा दिला होत. मतदानातून ते स्पष्टपणे दिसून आला.

Narayan Patil-Sanjay Shinde
Sanjay Shinde : मोठी बातमी : विधानसभेनंतर ‘आदिनाथ’च्या निवडणुकीतही संजय शिंदेंचा धक्कादायक पराभव

दरम्यान, मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप हे संजय शिंदे यांच्यासोबत होते. त्यांच्या मदतीमुळेच शिंदे हे आमदार झाले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पण विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत आणि आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत जगताप यांनी नारायण पाटील यांच्यासोबत जाणे पसंत केले होते. जगताप यांचा पाठिंबा हाच विधानसभा आणि आदिनाथच्या निवडणुकीत महत्वपूर्ण ठरल्याचे दिसून आले आहे. तसेच जगताप यांनी शिंदेंना का सोडलं, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com