
Solapur, 04 August : ‘राम सातपुते, तुमच्या विरुद्ध निवडून आलेला सभागृहात आल्यावर सारखं म्हणायचा, ‘राजीनामा देतो, राजीनामा देतो.’ मी म्हणायचो, ‘कधी देतो, कळतच नाही.’ काही लोकांना माहित नसतं. आम्ही त्या अनुभवातून गेलेलो आहोत. नवीन निवडून आलेला माणूस लयं फडफड करत असतो, अशा शब्दांत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची धमकी देणारे आमदार उत्तम जानकर यांची खिल्ली उडवली.
माळशिरसच्या दौऱ्यावर आलेले संजय शिरसाट यांनी माजी आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांच्या घरी झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जानकर यांच्या राजीनामा देण्याची खिल्ली उडवली आहे. जानकर यांनी ईव्हीएमच्या विरोधात आवाज उठवत मी आमदारकीचा राजीनामा देतो, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, अशी मागणी केली हेाती. आमदार जानकर यांनी वारंवार राजीनाम्याची घोषणा केली होती.
उत्तम जानकर (Uttam Jankar) यांच्या राजीनाम्याचा तोच मुद्दा उचलून धरत माळशिरसमध्ये असलेले शिरसाट यांनी त्याबाबत भाष्य केले. ते म्हणाले, गावात पहिल्यांदा सरपंच झालेला माणूस म्हणत असतो की, ‘मीच मुख्यमंत्री आहे.’ त्या भावनेतून तो वागायला लागला की, तो काहीच दिवस राहतो आणि नंतर घरी बसतो. जनताच त्याला घरी पाठवत असते.
राजकारणात जेव्हा पाय टाकतो, तेव्हा त्या पद्धतीनेच राहिले पाहिजे. मी त्यांच्यावर (उत्तम जानकर) टीका करणार नाही, कारण त्यांच्या स्वभावात ते नाही. काहींचा मी म्हणजेच सर्वकाही, असा अविर्भाव असतो. मी म्हणजे सर्वकाही नसतं. जनतेमुळे आपल्याला खुर्च्या मिळालेल्या आहेत, ते कधी विसरता कामा नये. तोच माणूस मोठा होत असतो, असेही शिरसाट यांनी नमूद केले.
ते म्हणाले, आमचं कोणीही राजकारणात नव्हतं. जनतेच्या प्रेमामुळे आम्ही गेली ४२ वर्षे आम्ही टिकून आहोत. मी दहा वर्षे नगरसेवक आणि वीस वर्षे आमदार आहे. भरतशेठ गोगावलेसुद्धा चार वेळा आमदार आहेत. जिल्हा परिषद त्यांनीही काढलेली आहे. पण, आम्ही कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतो. ते जेव्हा आपल्या व्यथा सांगतात, तेव्हा आपल्याला खरी परिस्थिती कळते.
आमचा स्वभाव तर असा आहे की, आम्ही कमी आवाजात बोललं तरी बातमी होते, मोठ्या आवाजात बोललं तरी बातमी होते. आमच्यावर बातम्या केल्याशिवाय चॅनेलवाल्यांना करमतही नाही, अशी मिश्किल टिपण्णीही संजय शिरसाट यांनी बोलताना केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.